Subscribe Us

header ads

राज्यात दिवसभरात १४५ रूग्णांचा मृत्यू ५ हजार ९१४ जण कोरोनामुक्त

मुंबई-: राज्यात आज दिवसभरात १४५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ४ हजार ५७५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर ५ हजार ९१४ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. यावरून असे दिसून येत आहे की, राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत व कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसून येत आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा मागील काही दिवसात सातत्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही अधिक आढळून आली आहे. तर, राज्यातील कोरोना निर्बंध जरी शिथिल केलेले असले, तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही, असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे. याशिवाय, जर नियमांचे पालन केले नाही व रूग्णसंख्या वाढली तर परत लॉकडाउन लावावा लागेल, असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे.राज्यात आज दिवसभरात १४५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, ४ हजार ५७५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याचबरोबर ५ हजार ९१४ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. यावरून असे दिसून येत आहे की, राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे बोलले जात असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. व कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसून येत आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांपेक्षा मागील काही दिवसात सातत्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही अधिक आढळून आली आहे. तर, राज्यातील कोरोना निर्बंध जरी शिथिल केलेले असले, तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही, असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे. याशिवाय, जर नियमांचे पालन केले नाही व रूग्णसंख्या वाढली तर परत लॉकडाउन लावावा लागेल, असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे.राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२७,२१९ को रोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.९९ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६४,२०,५१० झाली आहे. तर, राज्यात आजपर्यंत १३५८१७ बाधितांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२१,२४,२५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,२०,५१० (१२.३२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,२०,९०५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २,६२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५३,९६७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा