Subscribe Us

header ads

आता तरी मोदी देवा पावणार का? महागाई कमी करणार का? मोदी मंदिरा समोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता ने केले आंदोलन.

पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी व्हावी या मागणीसाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी मंदिरासमोर घातले साकडे





पुणे-: पुण्यामधील औंध येथे उभारलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर हटवण्यात आले  आहे. मोदींच्या एका समर्थकाने पंतप्रधानांची एक दोन फुटाची मूर्ती असणारे मंदिर सुरु केल्याची बातमी वेगाने पसरल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भात आदेश देत मूर्ती हटवण्यास सांगण्यात आले . त्यानंतर ही मूर्ती हटवण्यात आली.या मंदिर उभारणाऱ्या मयुर मुंडे यांनी ही मुर्ती हटवल्याची बातमी समोर आली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी जाहीर केल्याप्रमाणे या मंदिरासमोर आज आंदोलन केले.
पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी व्हावी या मागणीसाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते मोदी मंदिरासमोर साकडे घालण्यासाठी आले होते. परंतु त्या आधीच मंदिरातून मोदींची मूर्ती हटवण्यात आली होती. ही मूर्ती भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या कार्यालयात असल्याचे सांगितले जात आहे. आता तरी मोदी देवा पावणार का? भक्तांच्या मदतीला धावणार का? महागाई कमी करणार का करणार का? असे गाण म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरासमोर आंदोलन कले .कालच घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भातुकलीमधील सिलेंडर प्रातिनिधिक स्वरुपात या मंदिरासमोर मांडण्यात आलेला. तसेच पेट्रोल, डिझेल आणि तेलाच्या बाटल्याही या ठिकाणी ठेवण्यात आले  होते . पेट्रोल, डिझेल, तेल, मसाल्याचे पदार्थ यांचा नैवेद्य दाखवून आरती देखील यावेळी करण्यात आली.

 योगेश मुळीक यांचा स्पष्टीकरण!

पुण्यातील औंध भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक छोटी  मंदिर उभारण्यात आले होते . भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी हे मंदिर उभारले होते . पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकजण येथे येऊन मोदींच्या मूर्तीच्या पाया पडताना दिसत होते. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला होता. राम मंदिर उभारणीची प्रेरणा घेत मोदी मंदिराची उभारणी करण्यात आल्याचा दावा मोदी समर्थकांकडून करण्यात आला होता. मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केले होते.

 मंदिराची उभारणी कोणी केली?

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरात मोदी यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला होता. त्यासाठी मुंडे यांनी १ लाख ६० हजार रुपयांचा खर्च केला होता. पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या मार्फत जयपूर येथून मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणण्यात आला होता. मयूर मुंडे यांनी मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता दर्शनी भागात लावली होती. तसेच शेजारील फलकावर मोदी यांच्या कार्याची माहिती देण्यात आली होती. मंदिराची उभारणी खासगी जागेत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा