Subscribe Us

header ads

आडगाव,कुक्कडगाव ,खुंड्रस,नाथापूर,बऱ्हाणपूर,रंजेगाव,भाटसांगवी,राक्षसभुवन, चव्हाणवाडी,बनले वाळू माफियाचे केंद्र


(बीड प्रतिनिधी)-:  बीड तालुक्यातील पिंपळनेर  हद्दीतून सिंदफना नदीपात्रा च्या हद्दीतील आडगाव,कुक्कडगाव ,खुंड्रस,नाथापूर,बऱ्हाणपूर,रंजेगाव,भाटसांगवी,राक्षसभुवन, चव्हाणवाडी,या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. दिवस रात्र उपसा सुरू असून कुणाच्या आशीर्वादाने हा वाळू उपसा सुरू आहे. याची चौकशी करून जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालने अत्यंत गरजेचे आहे.  नदीपात्रात (144) कलम लागू असताना तरीसुद्धा या वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. या वाळू माफियांना कुणाचाच धाक राहिलेला नाही म्हणून हे वाळूमाफिया रात्रंदिवस नंगानाच करीत आहे. आडगाव, कुक्कडगाव,खुंड्रस,नाथापूर,बऱ्हाणपूर,रंजेगाव,भाटसांगवी,राक्षसभुवन, चव्हाणवाडी, च्या नदीपात्रातून खुलेआम उपसा होत आहे. ही खरोखर महसूल विभागाच्या दृष्टीने लाजिरवाणी बाब आहे.याचे तहसीलदार मंडळ अधिकारी यांना फरक पडत नसेल या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी साहेबांनी पुरस्कार देऊन सन्मानित करावा असे या गावातील लोक बोलत आहे.
कुकडगाव खंडोबा मंदिर शेजारील नदीपात्रात अंधाराचा फायदा घेत दिवस-रात्र अवैधरित्या कलम (144)  नियमाचे उल्लंघन करून वाळूउपसा चालूच,पण कुठलाही अधिकारी कडक कारवाई करताना का दिसत नाहीत...? कुक्कडगाव.खुंड्रस . रामगाव  चव्हणवाडी येथील शिंदफणा  नदी पात्रातुन हजारो ब्रास अनाधिकृत वाळु उपसा केला जात आसतांना महसुलचे उपविभागीय अधिकारी नायब तहसीलदार हे कोणतीही कारवाई करत का नाही.अशी सर्वत्र बीड जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. प्रशासन फक्त सर्वसामान्य वरच कारवाई करणार का वाळू माफिया वर का कडक कारवाई करत नाही.मग या वाळु माफिया यांच्याविरोधात कार्यवाही कोण करणार? रोज हजारो ब्रास अनाधिकृत वाळु उपसा रात्र न दिवस करुन विना रॉयल्टी पावतीची अवैधरीत्या वाहतुक केली जात असतांना महसुल व पोलिस प्रशासन प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी गप्प का?? मा. सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त औरंगाबाद, मा. राधाबिनोद शर्मा जिल्हाधिकारी बीड यांनी लक्ष घालून कोणी अर्थीक उलाढाल करत असेल तर त्यांची चौकशी करुन निलंबीत केले पाहिजे.

*जिल्हाधिकारी साहेब तुम्ही लक्ष घालाच*

पिंपळनेर हद्दीतील या अवैध वाळू उपसाला  जनता वैतागली असून अनेक वेळा निवेदन, आंदोलन करून सुद्धा काहीच फरक पडत नसून तहसीलदार, मंडळाधिकारी यांचे वाळूतस्करांची लागोबांधे असल्याने हे वाळू माफिया सर्वत्र नंगानाच करीत आहे. तरी नवीन आलेल्या जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून हा नंगानाच थांबावा आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी या गावातील लोक करीत आहे.

*नदीपात्रात कुठे आहे अवैध साठा*

*कुकडगाव खंडोबा मंदिर शेजारी*
*आडगाव, ,खुंड्रस,नाथापूर,बऱ्हाणपूर, रंजेगाव,भाटसांगवी,राक्षसभुवन, चव्हाणवाडी,*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा