Subscribe Us

header ads

जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन


बीड-: जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. हेमंत महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी राष्ट्रीय लोकन्यायालयास सुरवात झाली.कोरोना संसर्गामुळे संपूर्ण काळजी घेऊन आजच्या लोकन्यायालयाचे आयोजन  करण्यात आले असून सॅनिटायझर आणि थर्मल गनचा वापर करण्यात आला आहे.जिल्हयातील जिल्हा व तालुका न्यायालयाच्या सर्व ठिकाणी आज राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. भुसंपादनाची प्रकरणे, दिवाणी दावे, बॅकाची कर्ज प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे आणि दिर्घकाळ प्रलंबित विविध प्रकारचे दावे तडजोडी साठी घेण्यात आले आहेत.न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यायालयात व्हर्च्यूल सेटलमेंट मोड पध्दतीचा उपयोग करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सिध्दार्थ गोडबोले यासह विविध न्यायिक अधिकारी, वकिल, पक्षकार व नागरीक उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा