Subscribe Us

header ads

अण्णाभाऊ तुमची लोकशाहीरी आमची प्रेरणा-आ.संदीप क्षीरसागर

कामगार व आंबेडकरी विचाराच्या आदर्श प्रवर्तकाला शहरात अभिवादन
बीड (प्रतिनिधी):- अण्णाभाऊ साठे यांनी कामगार वंचित पीडितांचा आवाज शब्दबद्ध करताना बंडाचा डफ रशिया पर्यंत निनादला , त्यांच्या लोकप्रबोधनाची चाड आजही आदर्श व आम्हाला प्रेरणा देते राजकीय व सामाजिक जीवनात शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आज आम्ही काम करत आहोत . लोकसेवा व लोकजागर या अण्णाभाऊ साठेंच्या सत्व तत्वाची आठवण साहेब आम्हाला नेहमी करून देतात , मागास व वंचित लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येताना मुलभूत गरजा व भौतिक विकासा साठीची बांधिलकी आम्हाला अण्णाभाऊ यांच्या विचारातून मिळते . अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बीड शहरात मोठा उत्साह दिसून आला यावेळी आ. संदीप क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .

बीड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना आमदार, संदीप भैया क्षिरसागर बोलत होते, यावेळी  माजी आमदार,सय्यद सलीम रवींद्र दळवी,आसाराम भाऊ गायकवाड, बाप्पा सोनवणे, जयंती चे अध्यक्ष, अशोक अण्णा रोमन, विनोद हातागळे, हनुमंत वाघमारे ,सचिव, पंकज चांदणे, उपाध्यक्ष, गणेश जाधव, गौतम मोरे, कार्याध्यक्ष,राजू महूवाले जयमल्हार बागल. स्वप्निल हातागळे,व विठ्ठल काळे, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष शरदराव चव्हाण, बाळासाहेब गोरे, पंकज बाहेगवनकर सुरेश गिराम, मजहर खान शिदीकी फारुकी, बंटी कागदे, आप्पा कदम, बाळासाहेब सुर्वे, मिटन कोठुळे, विशाल बोबडे, संदिप ढोले, पपु शिंदे, पपु मस्के, सतीश मस्के, बाजीराव गायकवाड, महेश साळुंखे, अंकुश खडके सचिन हरणमारे, अभिजीत मस्कर, अजिंक्य घिगे, दत्ता काशिद, गोटू काळे, नंदू शिंदे, सुग्रीव शिंदे, शिवाजी शिंदे, अनिल पवार, संतोष कोठुळे, अनुरथ मस्के, गिरीश करवा, बाळु भालशंकर, नितीन भालेराव आदी उपस्थित  होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा