Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडी नगरपालिका निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार - अशोक हिंगे (पाटील

अंबाजोगाई/प्रतिनिधी-: आगामी नगरपालिका निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार आहे.  कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयारीला लागावे. वंचित च सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकते.  मराठा आरक्षणाला सर्वात पहिल्यादा बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला ओबीसींचा राजकीय आरक्षण संपवल्या नंतर आरक्षणाचा प्रश्न बाळासाहेबांनी च ऐरणीवर आणला मराठा मुस्लिम ओबीसी मधील वंचित कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी संधी देऊन न्याय मिळवून दिला आहे. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी  राजकिय पर्याय असणार आहे असे प्रतिपादन वंचीत चे मराठवाडा अध्यक्ष  अशोक हिंगे पाटील यांनी अंबाजोगाई येथील आढावा बैठकीत केले यावेळी वंचित बहुजन आघाडी चे  जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांचा मराठवाडा दौरा येत्या ४ सप्टेंबर ला बीड जिल्ह्यात आहे त्याच्या पूर्वतयारी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबाधणी ,शाखा बांधणी,बूथ बांधणी च्या तयारी च्या आढावा साठी ही बैठक अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी अध्यक्षस्थानी बीड जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, प्रमुख उपस्थिती मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील,  डॉ.सुरेश शेळके, रमेश गायकवाड, अनंतराव सरवदे, बबन वडमारे, मिलींद घाडगे, शैलेश कांबळे, सुरेश बचुटे, प्रसेनजीत रोडे,संजय तेलंग, सुशांत धवारे, चरणराज वाघमारे,बाबुराव मस्के,अमोल हातागळे, रामराजे सरवदे, खाजामिया पठाण, ऍड. काळम पाटील, ऍड सुभाष जाधव,संजय गवळी, निलेश साखरे, बाबा मस्के, अनिल कांबळे, मारुती सरवदे, अक्षय भूंबे, कपिल शिनगारे, उमेश शिंदे ,परमेश्वर जोगदंड, पोटभरे ताई, सरवदे ताई, धमांनद कासारे, विशाल कांबळे,गोविंद जोगदंड,स्वप्नील ओव्हाळ,सचिन वाघमारे,व बुध्दभूषण कांबळे  आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद मस्के यांनी तर आभार प्रदर्शन राहुल कासारे यांनी मांडले ,जिल्हा व तालुका, शहर ,  पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा