Subscribe Us

header ads

रेखाताई ठाकुर यांच्या उपस्थितीत बीड मध्ये वंचित बहुजन आघाडी चा ४ संप्टेबंरला कार्यकर्ता मेळावा -- अशोक हिंगे


बीड /प्रतिनिधी दि.२३ वंचित बहुजन आघाडी च्या प्रभारी अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यात ०४ सप्टेंबर रोजी भव्य संवाद कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे,अशी माहिती मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी जिल्हा पदाधिकारी बैठकीत दिली.श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाची धुरा सध्या प्रभारी अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या कडे आली आहे, त्यांनी  यापूर्वी विदर्भ विभागाचा दौरा करुन कार्यकर्त्यांच्या पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी, आढावा घेऊन संवाद मेळावे घेतले आहेत. दिनांक २८ जुलै रोजी त्या मराठवाडा दौऱ्यावर येत आसुन  उस्मानाबाद पासुन दौ-याची सुरुवात होणार आहे. 
या मेळाव्यात सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांना कार्याचा आढावा द्यायचा असुन‌ येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षांची तयारी याविषयी माहिती द्यावयाची आहे.या मेळाव्यास राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडीच्या राज्य सचिव अरुंधतीताई शिरसाट, मराठवाडा विभागीय कार्यकारिणीची उपस्थिती असणार आहे. 
 आजच्या बैठकीला विभागीय  उपाध्यक्ष दिपक डोके,अँड अशोक खरात, लोकसभेचे उमेदवार प्रा. विष्णु जाधव माजी अध्यक्ष शिवराज बांगर,ईजि विष्णु दादा देवकाते जिल्हा पदाधिकारी सचिन मेंघडंबर, धम्मानंद साळवे, अनंतराव सरवदे, भगवंत वायभसे, संतोष जोगदंड, सुदेश पोतदार,भारत तांगडे, अंकुश जाधव, दगडु गायकवाड,  डॉ. गणेश खेमाडे, ज्ञानेश्वर कवठेकर, अजय सरवदे सह सर्व तालुका पदाधिकारी,शहर पदाधिकारी उपस्थित होते,
बैठकिचे सुत्रसंचलन बबनराव वडमारे तर आभार भारत तांगडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा