Subscribe Us

header ads

महसूल प्रशासनच्या आशीर्वादाने वाळू माफियाचा अवैध रीतीने रात्रंदिवस वाळू उपसा सुरूच!!


(बीड प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील नागरिकांना वाळू माफिया पासुन कधी सुटका मिळेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे गेले अनेक महिन्यांपासून बीड जिल्ह्यात वाळू माफिया रात्रं दिवस वाळूचा उपसा करत आहेत. आणि महसूल प्रशासन उघड्या डोळ्याने बघून त्याकडे दूर लक्ष करत आहेत.त्या मुळे वाळू माफियांनी डोके वर काढून वाळू चोरीचा सपाटाच लावला आहे. याकडे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी महसूल.आणि प्रशासन यांच्या कडे वेळ नाही. कुक्कडगाव,खुंड्रस, रामगाव,राक्षसभुवन,भाटसांगवी,येथे दिवस रात्र वाळूउपसा चालु आहे. आणि वाळू माफिया अवैध मार्गाने पैसे   कमवत आहेत. आणि साधारण नागरिक वागू शकत नाही असे रस्ते करतात या सर्व गावातून पाऊस पडल्यास मोटारसायकल सुद्धा गावाबाहेर निघत नाहीत या गावातील नागरिकांनी अनेक वेळा महसूल विभाग प्रशासन. यांच्या कडे तक्रार केले पण महसूल विभाग आणि प्रशासन. बघ्याची भूमिका घेत आहेत. मंडळ अधिकारी यांच्या समोरून वाळूची गाडी गेली असता ते फक्त बघायची भूमिका घेतात कोणतीही कारवाई न करता बघून परत जातात याचा अर्थ काय? समजायचं मंडळ अधिकारी. महसूल विभाग. प्रशासन  यांची कारवाई होत नसेल तर जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल आता नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी मा.राधाबिनोद शर्मा साहेब यांनी मंडळ अधिकारी. महसूल विभाग. प्रशासना  विरुद्ध कारवाई करावी व जिल्ह्यांतील नागरिकांना वाळूमाफियापासून मुक्त करावे. आणि जे वाळू माफियाना  पाठिंबा देऊन बघ्यांची भुमिका घेत आहेत.त्यांचा विरोधात जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य ती कारवाई करावी नसता जनता रस्त्यावर उतरेन अशी या भागातील नागरिकात चर्चा आहे. अनेकवेळा पहिल्या जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष पथकाची मोहीम राबवली असता तहसीलदार. महसूल विभाग याना कारवाई चे आदेश दिले असता कोणीही कारवाही केली नाही आणि जिल्ह्यात १४४ लागू असुन देखील शिंदफणा नदी पात्रातून वाळूचा उपसा महसूल विभागच्या  आशीर्वादाने रात्र दिवस सुरू आहे. १४४ आणि लॉकडाऊन हा कायदा वाळू माफिया साठी नाही का? प्रशासन हे फक्त गरीब जनतेचा छड करण्यासाठी आहे का? असे अनेक प्रश्न जनता करत आहे. कुक्कडगाव. खुंड्रस. राक्षसभुवन. या सर्व गावातील अनेक जाग्यावरचे अनेक वाळूचे साठ्यांची माहिती मंडळ अधिकारी. महसूल विभाग.  पिंपळनेर पोलिस ठाणे यांना कळवण्यात आली असता कोणीही कोणती कारवाई करत नाही मंडळ अधिकारी जेव्हां येतात तेव्हा  त्यांच्या समोरून वाळूने भरलेले टीप्पर जाते आणि ते फक्त  बघायची भूमिका घेतात.आणि परत जातात कारवाई का केली नाही असे विचारले असता आम्ही येतो तेव्हा आम्हाला कोणते टिप्पर किंवा वाळू भेटत नाही असे  बोलतात अता वाळू माफिया कडे नव्याने रुजू झालेले जिल्हाचे अधिकारी राधाबिनोद शर्मा साहेबांनी लक्ष द्यावे.आणि जे अधिकारी बघ्यांची भुमिका घेत आहेत. त्यांच्यावर  कारवाई करावी अशी मागणी      कुक्कडगाव,खुंड्रस, रामगाव,राक्षसभुवन,भाटसांगवी,चे लोक करीत आहे.          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा