Subscribe Us

header ads

आमदार संदिप क्षीरसागर यांनी डीपीडिसीमध्ये उपस्थिती केलेले मुद्दे.

बीड-: बीड मतदार संघासाठी नवीन १०० रोहित्र बसवण्यास मंजुरी द्या, श्री क्षेत्र नारायनगडाच्या विकासासाठी विशेष निधी, जिल्हा परिषदेच्या परिसरात संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्या बाबत तात्काळ कार्यवाही सुरू करा.

आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा नियोजनच्या बैठककिती बीड मतदारसंघातील अनेक महत्वाचे विषय मांडले.  ना.धनंजय मुंडे मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तथा पालकमंत्री बीड जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठक घेण्यात आली.

*नारायणगड*

श्री क्षेत्र नारायणगड येथील विकास कामासाठी 25 कोटींचा आराखडा मंजूर आहे, यातील 3 कोटींची कामे झाली उर्वरित विकास कामे लवकर सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. श्री क्षेत्र नारायण गडासह तीर्थ क्षेत्र विकास साठी आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांनी अर्थ संकल्पात विशेष तरतूद केली. याबाबत नारायण गडाच्या विकासासाठी पालकमंत्री महोदयांनी मंत्रालय स्तरावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या कडे बैठक लावून अधिक निधी विकासासाठी द्यावा.

*अंगणवाडी*

बीड मतदारसंघातील उघड्यावर भरणाऱ्या अंगणवाडी यांच्या इमारतीस निधी द्यावा, बीड जिल्ह्यातील जो फेब्रिकेटेड अंगवाडीसाठी 18 कोटींचा निधी शासनास परत गेला आहे तो निधी बीड जिल्ह्यातील अंगवाडी साठी पुन्हा शासनाकडून मिळवण्यासाठी पालकमंत्री महोदय यांनी विशेष प्रयत्न करावेत, तशी विनंती आजच्या बैठकीतुन करतो.

*महावितरण*

बीड मतदारसंघात 100 नवीन रोहित्र मंजूर करावेत, तसेच 63 एच पीचे 50 रोहित यांची क्षमता 100 hp करण्यात यावी, पाली येथील 33  केव्ही उपकेंद्रास जागा उपलब्ध नसल्याने काम होऊ शकले नाही, परंतु आता जागेचा प्रश्न सुटला आता तात्काळ काम सुरू करण्यासाठी निधी द्यावा
अंजनवती, वढवडी, बोरखेड, व ताडसोना येथील प्रस्तवित 33 केव्ही उपकेंद्रास  मंजुरी  तात्काळ मंजुरी द्यावी व वरिष्ठ पातळींवर  पाठपुरावा करण्यात यावा तसेच गवारी मांजरसुबा येथील लोड क्षमता वाढवण्यात यावी ही विनंती.

*पर्यटन विकास*

पर्यटनाच्या दृष्टीने पाली येथील शांतीवनचा विकास व्हावा त्यासाठी अधिकचा निधी देण्यात यावा.

बीड जिल्ह्या परिषद येथे संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी dpdc मधून अधिक निधी द्यावा व तशी तरतुद करून  पुतळा बसवण्यासाठी ज्या परवानगी
आवश्यक आहेत, त्या तातकळ घेण्याचा सूचना देण्यात याव्यात.

*जिल्हा परिषद विभाग*

जि. प येथील भूजल सर्वेक्षण कार्यालय येथील रिक्त पदे तातकळ पदे भरवन्यात यावीत.

*आरोग्य विभाग ग्रामीण*

शिरूर (का.) तालुक्यातील खलापुरी येथील आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधकामची मागणी करतो.

*नगर परिषद बीड*

बीड नगर पालिकेतील अनागोंदी अनेकवेळा समोर आली आहे, पालिकेन जी अर्थ संकल्पित सभा घेतली, त्यात साडे तीनं कोटींची तरतूद रस्ते व नाली बांधकामासाठी करण्यात आली. अर्थसंकलपाच्या कमी जास्त खर्च करता येत नाही अशी तरतूद नगर पालिका नगर पंचायती अधिनियम 1963 च्या कलम 101 मध्ये आहे. असे असताना नगर पालिकेने कायद्याचे उलघन करत 11 ते 20 कोटी केली टेंडर केली जे की अत्यंत चुकीची आहे. आज रोजी पालिका शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे, शहरातील पथदिवे वीज बिल पालिकेने नभरल्याने बंद आहेत, शहर पूर्ण आधारात आहे. 26 कोटींची थकबाकी महावितरणची पालीकेकडे आहे. ती न भरता शहराला जाणुन बुजून अंधारात ठेऊन चुकीच्या पद्धतीने टेंडर केली आहे.

पालिकेच्या ओडिड मध्ये कलम 101 अनव्ये अर्थ संकलपिय तरतुदी पेक्षा कमी जास्त खर्च करता येत नाही तरी देखील अर्थ सकल्पातील तरतुदीपेक्षा आधिक व अर्थ संकल्पात तरतूद नसताना ही भरमसाठ खर्च करून बीड नगर परिषद अधीनियम व लेखे को 1971 चे उल्लंघन केलेले आहे असे स्पष्ट ऑडिड रिपोर्ट मध्ये म्हटलेलं आहे.

मूलभूत सुविधा पुरविण्यास बीड पालिका दुर्लक्षकरत शहरातील जनतेला वेठीस धरत आहे, जे नियम बाहय आणि कायद्याच्या विरोधातील टेंडर आहेत ते तातकळ रद्द करून शहरातील जनतेशी आवश्यक त्या मूलभूत सुविधा द्याव्यात.

*आरोग्य विभाग*

जिल्हा रुग्णालय, बीड येथे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना सीटी स्कॅन करण्यासाठी उच्च प्रतिची ऍडव्हान्स सिटी स्कॅन मशीन व कलर डॉप्लर करिता 2डी इको मशीनची मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा