Subscribe Us

header ads

KBC 13 च्या करोडपती दृष्टीहीन हिमानी बुंदेलने रचला इतिहास

मुंबई-:छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय शो आहे. यंदाचे ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. या शोला एवढ्यातच त्याची पहिले करोडपती स्पर्धक मिळाली आहे. स्पर्धक हिमानी बुंदेल असे त्या स्पर्धकाचे नाव आहे. हिमानी या आता ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. त्यांनी १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्या ‘कौन बनेगा करोडपती १३’ च्या पहिल्या विजेता ठरल्या आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
कौन बनेगा करोडपती’ या शोचा प्रोमो सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये हिमानी यांनी १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि त्या शोच्या पहिल्या करोडपती ठरल्या आहेत. आता हिमानी या ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्याला आगामी एपिसोडमध्ये दिसणार आहेत. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे हिमानी यांची स्तुती करताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा