Subscribe Us

header ads

बीड डाक विभागाकडून डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजने अंतर्गत “डायरेक्ट एजंट” (विमा सल्लागार) च्या भर्तीकरिता मुलाखती घेण्यात येत आहेत.

बीड-: बीड डाक विभागाकडून डाक जीवन विमा(PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा(RPLI) योजने अंतर्गत “डायरेक्ट एजंट” (विमा सल्लागार) च्या भर्तीकरिता मुलाखती घेण्यात येत आहेत. सदरील अर्ज डाकघर अधिक्षक कार्यालय, बीड विभाग, बीड येथे उपलब्ध आहे.,

 

पात्रता व मापदंड 

१. वयोमर्यादा :-  उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी १८ वर्षं व जास्तीत जास्त ५०         वर्ष दरम्यान असावे.

२. शैक्षणिक पात्रता    : -  अर्जदार हा १0 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी                       ज्यात केंद्रीय/राज्य मान्यता प्राप्त घेतली आहे.

३. श्रेणी : - बेरोजगार , स्वयंरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते , महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य ई. टपाल जीवन विमा साठी थेट असे अर्ज करू शकतात.

४. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इ. बाबी अपेक्षित.

५. निवड झालेल्या उमेदवारास रु. ५०००/- ची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी NSC/KVP च्या स्वरूपात असेल.

६. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो IRDA ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवाना मध्ये रुपांतरीत केली जाईल. सदर परीक्षा ३ वर्षेच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील.

७. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील.

 

सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दि. 3.०८.२०२१  रोजी कार्यालयीन वेळेत (०९:३० to १८:००) अधिक्षक डाकघर,खडकपुरा बीड विभाग, बीड – ४३११२२ येथे थेट मुलाखतीसाठी हजर राहावे व सोबत बायोडाटा, मूळ कागदपत्र, प्रमाणपत्र / अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे.

 

 

                                                       ( एस एम अली )

                                                       अधिक्षक डाकघर ,

     बीड विभाग बीड – ४३११२२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा