Subscribe Us

header ads

जिल्हयात अतिवृष्टीमुळे नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे आवाहन; जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित; मदतीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक 02442-222604

बीड, दि.  २८:--जिल्हयात  होत असलेल्या अतिवृष्टी मुळे  विविध ठिकाणी आणि नदीकाठच्या गावात पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. या भागातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे बीड जिल्हयात 11 तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मधील आपत्ती व्यवस्थापन निवारणार्थ जिल्हाधिकारी बीड येथील कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केलेला आहे. त्याचा संपर्क क्र 02442-222604 असा असून मदतीसाठी जनतेने कृपया या क्रमांकाशी संपर्क साधावा. तसेच आपल्या सभोवताली निर्माण झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास तसेच नदीकाठी राहणार्‍या जनतेने सतर्क राहावे  आणि पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास वरील क्रमाकांशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक