Subscribe Us

header ads

सोनपेठ तालुक्यातील बलात्कार प्रकरणी व बंजारा समाजाच्या मागण्या बाबत ना.विजय वडेट्टीवार यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे निवेदन

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड प्रतिनिधी/- परभणी जिल्हा सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडयावरील अल्पवयीन बंजारा मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील व गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांड्यावरील संदिप चव्हाण खुन प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, खटला जलदगती न्यायालयात चालवावा तसेच माजलगाव धरणाला माजी मुख्यमंत्री माहानायक वसंतरावजी नाईक यांचे नाव सन्मानपूर्वक देऊन नाईक साहेबांचा गौरव करावा,या प्रकरणी राज्य सरकारने त्वरित ठोस निर्णय घ्यावेत या मागण्यांचे निवेदन राज्याचे ओबीसी कल्याण तथा मदत व पुनर्वसन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहे.  राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद प्रा.पी.टी.चव्हाण यांनी ना. विजय
वडेट्टीवार यांच्या सोबत सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले आहे.बीड येथे आयोजित ओबीसी व्हिजेएनटींचा आरक्षण बचाव निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता,या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून ना.वडेट्टीवार मंचावर उपस्थित होते, तेव्हा बंजारा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात खालील जिव्हाळ्याच्या मागण्यांच्या समावेश करण्यात आला आहे.१९९० चा शासननिर्णय लागु करुन ५०० लोकसंख्या असलेल्या तांडा वाडी वस्तीवर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन कराव्यात .देशातील १५ कोटी बंजारा समाज बांधवांची मातृभाषा असलेल्या गोरबोलीचा केंद्राच्या आठव्या सुचीत समावेश करून राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, प्रत्येक तांड्यावर मुख्यमंत्री सडक योजनेतून डांबरी रस्ते तयार करण्यात यावे, प्रत्येक तांड्यावर पिण्याचे पाणी,अंतर्गत सिमेंट रस्ता,नाली,स्मशानभूमी बांधकाम करण्यात यावे, स्वतंत्र मतदान केंद्र, वाचनालय,व्यायाम- शाळांना मंजुरी देण्यात यावी,गोरगरीब निराधारांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा,आरोग्य उपकेंद्र,विद्युत पुरवठा (डीपी) ना मंजुरी देण्यात यावी. सांस्कृतिक सभागृह बांधण्यात यावे इत्यादी मुलभूत सुविधा तांड्यावर खासबाब ंम्हणून उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. राज्यसरकार कडून बंजारा समाजाच्या रास्त मागण्या सोडविण्यासाठी नक्कीच सकारात्मक निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.निवेदनावर बाजीराव राठोड, कृष्णा राठोड, संजय चव्हाण, सुशांत पवार,प्रकाश राठोड, सुरेश पवार,पवन जाधव, एकनाथ आडे,बाळू राठोड,सुंदरसिंग महाराज, अंकुश राठोड,विजय चव्हाण,गोरख पवार, सुरेश चव्हाण, राजाभाऊ चव्हाण,पापा चव्हाण यांच्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा