Subscribe Us

header ads

प्रभाग क्रमांक 12 मधील कचरा, घंटा गाड्यांच्या प्रतीक्षेत ! सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांचे मुख्याधिकारींना साकडे

बीड (प्रतिनिधी) - शहरातील बालेपीर भागात असलेल्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून कचरा घेऊन जाणार्‍या घंटागाड्या बंद असल्याने प्रभागात अनेक ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडून असल्याने मच्छरांचा उच्छाद वाढून नागरिकांना व विशेषतः लहान मुलांना विविध प्रकारचे आजार होऊन शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापासून वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी बीड नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन प्रभाग कचरामुक्त करावा आणि लोकांना रोगराई पासून वाचवावे. अशी मागणी केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, गेल्या तीन महिन्यांपासून बालेपीर भागातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या येणे बंद झाल्याने  प्रभागातील रोशनपुरा, औरंगपुरा, अक्सा कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, वाहेद नगर, भारत भूषण नगर या परिसरा मधील नागरिकांना कचरा फेकणे अवघड होऊन बसले आहे. *गाडी वाला आया घर से कचरा निकाल* हे गाणे वाजवीत येणाऱ्या गाड्या गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांना कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक पणे बंद झालेल्या आहेत. यामुळे परिसरामध्ये जिथे जागा भेटेल तिथे  कचरा टाकला जात आहे. यामुळे प्रभागात अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात कचरा पडलेला दिसत आहे. हा कचरा ही संकलित करून घेऊन जाण्याचे कर्तव्य बीड नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून होत नाही. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाला स्वच्छतेबाबत आलेली मरगळ नागरिकांच्या जीवावर उठत असून प्रभागातील रहिवाशांना थंडी तापसह अन्य आजार होत असून विशेषतः लहान मुलात डेंगू , मलेरिया व टायफाईड सारखे आजार बळावत चालले आहे. यामुळे या प्रभागातील नागरिक त्रस्त होत असून त्यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक गळचेपी ला तोंड द्यावे लागत आहे. तरी प्रभाग क्रमांक १२ मधील संपूर्ण परिसरात घंटागाड्या पाठविण्याचे नियमित नियोजन करण्याचे तसेच प्रभागात जागोजागी पडलेला कचरा उचलून नेण्यासाठी यंत्रणा पाठवून प्रभाग कचरामुक्त करण्याची कृपा करावी आणि येथील रहिवाशांना, लहान मुलांना रोगराईपासून वाचवावे. अशी  मागणी सामाजिक कार्यकर्ते  शेख मोहसीन यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा