Subscribe Us

header ads

रूईनालकोल शेख महंमद दर्गाह देवस्थान प्रकरणात बनावट दस्तावेज तयार करणारा अटकेत--- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


आष्टी_आष्टी तालुक्यातील मौजे रूईनालकोल येथिल शेख महंमद दर्गाह देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात बनावट दस्तावेज तयार करणारा मनोज दत्तात्रय रत्नपारखी याला आज पोलिसांनी अटक केली. 

सविस्तर माहीतीस्तव 
__
आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथिल शेख महंमद दर्गाह यांची १०२ एकर जमिन ईनामी जमिन बनावट दस्तावेज तयार करून विक्री प्रकरणात आजिनाथ त्रिंबक बोडखे, गोपीनाथ पांडुरंग बोडखे, सुरेश गहिनीनाथ बोडखे सर्व रा. आनंदवाडी ता.आष्टी, शेख मुस्ताक बादशाह रा. कडा ता.आष्टी यांनी देवस्थान अर्चक व अर्जदाराचे ७/१२ उता-यातील ईतर हक्कातील नाव कमी करून प्रतिबंधित मालक म्हणून नोंद लावली असून या जमिनीशी संबधित व्यक्ती अशिक्षित असून त्यांचा १०० रूपयाच्या बाॅण्ड पेपरवर बनावट वारस प्रमाणपत्र करून नावाच्या पूढे ऊर्दु, मराठी भाषेत सह्या मारल्या आहेत तर खोट्या दस्त ऐवजावर साक्षीदार म्हणून संजय भाऊसाहेब नालकोल (सरपंच, रूईनालकोल ता.आष्टी)व शरद नानाभाऊ पवार (रा.रूईनालकोल ता.आष्टी)यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या होत्या. 

बनावट दस्तावेज तयार करणारा अटकेत:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
__
वरील प्रकरणात बनावट दस्तावेज तयार करणारा मनोज दत्तात्रय रत्नपारखी ऊर्फ मुन्ना याला आज पोलीस निरीक्षक चाऊस आष्टी पोलीस ठाणे यांनी आज दि.१९ रविवार रोजी अटक केली असून पुढील तपास चालु आहे. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा