Subscribe Us

header ads

बीड नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर"तिरडी आंदोलन --- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

 
बीड प्रतिनिधी_ बीड नगरपालिकेतील आधिकारी-राजकीय पुढा-यांनी संगनमताने कोरोनाबाधितांच्या अंत्यविधी निधीत गैरव्यवहार तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आस्तित्वातच नसताना संकेतस्थळावर खोटी माहीती प्रसिद्ध करून मिळवलेले ओडीएफ प्लस प्लस मानांकन रद्द करण्यात यावेत तसेच बिंदुसरा नदीपात्रातील अनाधिकृत बांधकाम, कचरा टाकुन नदीपात्र प्रदुषित करून आरोग्यास धोका निर्माण केल्याबद्दल नगरपरिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरडी आंदोलन करण्यात येत आहे, 

सविस्तर माहीतीस्तव:-
__ 
बीड नगरपालिके मार्फत कोरोनाबाधित मयतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या निधीत मोठ्याप्रमाणात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला असून 746 कोरोनाबाधित मयतांसाठी बीड नगरपालिकेने 48 लाख 49 हजार रूपये निधी खर्च दाखवला असून अंबाजोगाई नगरपालिकेने 1350 मयतांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी 50 लाख रूपये खर्च केले आहेत, एका अंत्यविधी मागे अंबाजोगाई नगरपालिका 3700 रूपये खर्च करत असताना बीड नगरपालिका 6500 रूपये खर्च दाखवते मग एका मयताच्या अंत्यविधीमागे 2800 रूपये तफावत कशी काय याची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. 

  महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नसताना शासनाची दिशाभूल करून प्राप्त ओडीएफ प्लस प्लस मानांकन रद्द करावे 
___
बीड शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आस्तित्वातच नसताना नगरपालिकेने संकेतस्थळावर 25 महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आल्याचे दर्शवित शासनाची दिशाभूल करून ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त केले असून ते रद्द करण्यात यावे.महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तात्काळ बांधण्यात यावीत. खोटी माहिती देणा-या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. 

बिंदसरा नदीपात्रातील अनाधिकृत बांधकाम व कचरा टाकुन नदीप्रदुषण प्रकरणात गुन्हे दाखल करा 
___
बिंदुसरा नदीपात्रातील सारडा रेसिडन्सीच्या पाठीमागील अनाधिकृत बांधकाम केल्याने नदीपात्राची रूंदी कमी झाल्यामुळे भविष्यात पुर आल्यास जिवित व वित्तहानी मोठ्याप्रमाणात होऊ शकते तसेच ब्राम्हणवाडी-मंन्सुरशाह दर्गाह शासकीय ओढ्यातील बांधकाम अतिक्रमण प्रकरणात नगरपरिषद, भुमिअभिलेख, नगर रचनाकार, बांधकाम व्यावसायिक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच नदीपात्र कचरा टाकुन नदीपात्र प्रदुषित करून नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण केल्याबद्दल संबधित नगरपालिकेतील जबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी. 
वरील मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिरडी आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर , सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे,सुधाकर ससाणे, देवडकर सुनिल, सुरज कदम आदि. सहभागी होते. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 
मो. नं.८१८०९२७५७२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा