Subscribe Us

header ads

वृत्त गणेश उत्सव मध्ये जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

 

बीड, दि. 11:--   Covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करायवच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने गृह विभाग, महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्र. आरएलपी- 0621 /144 /विशा 1 ब  दि. 29.06.2021 व दि.08.09.2021 अन्वये सार्वजनिक गणेशोत्सव 2021 करिता मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेले असून गणेश उत्सवादरम्यान मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येवून दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. दर्शन केवळ ऑनलाइन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे. असे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात खालील प्रमाणे आदेश सार्वजनिक गणेशोत्सव 2021 कालावधीमध्ये लागू करणेबाबत पोलीस अधीक्षक, बीड यांनी कळवले आहे.तसेच अपर जिल्हादंडाधिकारी, बीड फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये खालील बाबी करण्यास मनाई करीत असून सार्वजनिक गणेश मंडळाच्या  गणेश मूर्तीचे मुखदर्शन घेण्यास अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून, दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे. सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक  असून  जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने तसेच शासनाने गणेश उत्सव संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांची अंमलबजावणी होण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात येत आहेत. सदरचे आदेश बीड जिल्ह्याच्या हद्दीत दि. 20 सप्टेंबर 2021 चे 24:00 वाजेपर्यंत लागू राहतील असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा