Subscribe Us

header ads

शनिवार 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन

बीड, दि. 23 (जि.मा.का.) बीड जिल्ह्यातील जिल्हा व तालुका न्यायालयाच्या सर्व ठिकाणी शनिवार दि. 25 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी त्यांची न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी येणा-या राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक बीड यांनी केले आहे.राष्ट्रीय लोकन्यायालयात दाखल पूर्व प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे, दिवानी दावे, बँकाची कर्ज प्रकरणे, कौटुंबिक कलहाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, दुरध्वनी देयकाची प्रकरणे, नगरपालीका, ग्रामपंचायत, विद्युत महामंडळ, राज्य परिवहन महामंडळ, वाहतुक शाखा इत्यादी तडजोडजन्य प्रकरणे ठेवण्यात येणार असून प्रकरणात तडजोड झाल्यास शंभर टक्के न्यायालयीन शुल्क परत मिळेल.25 सप्टेंबर 2021 रोजी होणा-या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा,असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा सेवा प्राधिकरणाचे हेमंत श. महाजन, जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सिध्दार्थ ना. गोडबोल बीड, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड एस. के. राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा