Subscribe Us

header ads

३० जणांनी मिळून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केले सामूहिक बलात्कार!

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला . आरोपींमधील २२ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केलं जात होतं. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा