Subscribe Us

header ads

राज्यातील ऊसतोड कामगारांनी ग्रामसेवक मार्फत नाव नोंदणी करावी---- सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष.. खंडू जाधव

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड प्रतिनिधी_ लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील ऊसतोड मजुरांनी ग्रामसेवकामार्फत आपली नावनोंदणी करून घ्यावी असे आवाहन  सामाजिक कार्यकर्ते खंडू जाधव यांनी केले आहे.उसतोड कामगारांनी ग्रामसेवकाकडे स्वतःचा फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आदींसह कागदपत्रांची सत्यप्रत देवून आपली नाव नोंदणी करावी. तसेच ज्या ऊसतोड कामगारांनी सध्या ऊसतोडणीचे काम बंद केलेले आहे. मात्र पूर्वी ते ऊसतोडणी करत होते, अशा कामगारांची पण नाव नोंदणी करावी असेही सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष खंडू जाधव यांनी सांगितले आहे. हाडाचे काडं आणि रक्ताचे पाणी करून गोड साखर निर्माण करणाऱ्या ऊसतोड कामगारांना राज्यशासना मार्फत सर्व लाभ मिळावा या उदात्त भावनेतून लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापन केलेली आहे. ग्रामसेवकांनी सर्व ऊसतोड कामगारांचा आदर करून अचूक नोंद करावी  असेही विनंती सामाजिक कार्यकर्ते खंडू जाधव यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा