Subscribe Us

header ads

फुलसांगवीसह परिसरातील विकास कामे प्राधान्याने मार्गी लावेल-आ.संदिप भैय्या क्षीरसागर फुलसांगवी,मार्कडवाडी,हाजीपुर येथील 50 लक्ष रूपयांच्या विकास कामांचे लोकार्पण

फुलसांगवी (प्रतिनिधी):- अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे, याचे पंचनामे करून शासन मदत देईल. या फुलसांगवी परिसरातील जनतेने स्व.काकू-नानापासून प्रेम केले आहे. या परिसरातील वाडी, वस्ती, तांड्यावर मुलभूत प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहिल अशी ग्वाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी दिली आहे. ते फुलसांगवी, मार्कडवाडी, हाजीपुर या गावांना भेटी देत 50 लक्ष रूपयांच्या विकास कामांचे लोकार्पण करत असतांना बोलत होते. 
आ.संदिप भैय्या क्षीरसागर सध्या ग्रामीण भागातील वाडी,वस्ती, तांड्यावर जावून जनतेशी संवाद साधत आहेत. रविवारी त्यांनी फुलसांगवी, मार्कडवाडी, हाजीपुर या गावांना भेटी दिल्या. ग्रामस्थांशी चर्चा करून गावातील समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही दिली. गेल्या अनेक वर्षापासून फुलसांगवी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्याचा प्रश्‍न प्रलंबित होता. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी 25 लक्ष रूपयांचा निधी देवून या वर्गखोल्यांच्या इमारतीचे लोकार्पण केले, त्याचबरोबर फुलसांगवी, मार्कडवाडी, हाजीपुर या गावातील सिमेंट रस्ते, सौर पथदिवे व इतर विकास कामंचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी या भागातील नागरिकांशी संवाद साधला. गेल्या अनेक वर्षापासून जी विकास कामे झाली नाहीतत ती विकास कामे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून पुर्ण करेल, या भागातील वाडी,वस्ती, तांड्यावरील रस्ते व मुलभूत प्रश्‍न सोडवेल अशी ग्वाही दिली. यावेळी गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्र दादा क्षीरसागर, माजी जि.प.सदस्य मदन जाधव, माऊली सानप, जीवनराव जोगदंड, हंगे दादा, भास्कर सानप, जग्गु मार्कड यांच्यासह परिसरातील नागरिकांची  उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुलसांगवी येथील माजी सरपंच तळेकर, अविनाश सानप, जग्गु मार्कड, अप्पा उगले व इतरांनी परिश्रम घेतले. 

रवीशेठही गेले शेतकर्‍यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करत नव्याने विकास कामे करण्याची दिली ग्वाही


स्व.काकू-नानांपासून फुलसांगवी, मार्कडवाडी, हाजीपुर या परिसरातील जनतेने प्रेम दिले आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर  यांच्या पाठिशी या भागातील जनतेने आशिर्वाद दिल्यानंतर कोणतीही निवडणूक नसतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर, गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्र क्षीरसागर या भागातील जनतेशी गाव भेट दरम्यान संवाद साधत आहेत. जी विकास कामे मागील अनेक वर्षात झाली नाहीत ती पुर्ण करण्याची ग्वाही देत या परिसरातील 50 लक्ष रूपयांच्या विकास कामांचे लोकार्पणही त्यांनी केले. अतिवृष्टीमुळे या भागातील रस्ते खचले, शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी व शेतकर्‍यांना मदत मिळून देण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्यासोबत गजानन कारखान्याचे चेअरमन रविंद्रदादा क्षीरसागर गेले असल्याचे दिसून आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा