Subscribe Us

header ads

सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले यांचा वाढदिवस साजरा करू नये



बीड (प्रतिनिधी):- सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तीमत्व म्हणून सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले सर्व परिचीत आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय असून कौतुकास पात्र असे होते. सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यापासून ते रक्तदान शिबीर घेण्यातपर्यंत त्यांचा ध्यास असतो. अपंग, दिव्यांग,निराधार, अनाथ, सर्वसामान्य घटकातील नागरिकांचे प्रश्नाचे, समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील असतात. कसलाही स्वार्थ न पाहता जनतेच्या अडचणी कशा सोडवल्या जातील हीच ध्यानी-मनी विचार असलेले सामजिक कार्यकर्ते अशोक (दादा) ढोले पाटील यांचा वाढदिवस दि  14 सप्टेंबर ..... दिवशी आहे.  परंतू मागील कोरोच्या महामारीत त्यांचे आजोबा यांचे कोरोनाशी लढतालढता निधन झाले. त्यांची प्राणज्योत मावळल्याने त्यांच्या कुटूंबाचा आधारवड गेल्याने ढोले कुटूंब दु:खात आहे. सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले यांचे वडीलांचे काही वर्षांपुर्वी निधन झालेले आहे. त्यांचा वडीलांचा डोक्यावरच हात गेल्याने  ते दु:खात असुनही गंभीरपणे जीवनाची वाटचाल चालू ठेवत सामाजिक कार्याचा वसा जपत राहिले. दु:खाचा डोंगर पार करत असतानाच कोरोनाच्या महामारीत वडीलानंतर आजोबांचा आधारवडाप्रमाणे खंबीर आधारही नियतीने हिरावून घेतला. अशा दु:खद घटनामुळे सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले जन्मदिवस साजरा करणार नसून याची दखल सामाजिक कार्य करत असताना जी व्यक्ती जोडली गेली आहेत त्यांनी घ्यावी आणि वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन ढोले कुटूंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा