Subscribe Us

header ads

अंबाजोगाई खून प्रकरणी अकरा लोकांवर गुन्हा दाखल! एकाला अटक


अंबाजोगाई-: वराहाचे पिल्लू मारल्याचा जाब विचारल्याच्या करणावरून वादावादी झाल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान  एका 30 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून  केल्याने अकरा व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकास अटक केली आहे. 
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी दिलीप अभिमान धोत्रे व मयत रवी अभिमान धोत्रे दोघे भाऊ शहरातील वडारवाडा परिसरात वराह  पालनाचा व्यवसाय करतात.दीपकसिंगटाक, हिम्मत उर्फ डागा सिंग, वीरूसिंग घोके हे धोत्रे यांच्या घरासमोर येऊन तिघा तरुणांनी वरा  हाचे पिल्लू मारलेमुळे रवीने आमची वराह का मारले असा जाब विचारला यावेळी शाब्दिक बाचाबाची देखील झाली.दीपकसिंग टाक याने फोनवरून गोविंदसिंग घोके, संतोषसिंग झुकी,अजय शेरसिंग, विजू शेरसिंग, दीपक मच्छिंद्र घोके,पूनमसिंग टाक, तेजस शेरसिंग, मच्छिंद्र घोके, यांना बोलून घेतले असता मोटरसायकल वर हातात तलवार चाकू काठ्या घेऊन आले व तुम्ही आमच्या माणसाला का पकडले असे बोलत आमच्या वर हल्ला केला.यावेळी एका तरुणाने भाऊ रवि यास पकडले आणि धारदार शस्त्राने दोघांनी वार केल्याने रविचा मृत्यू झाला व मला ही मारहाण केली. उभ्या असलेल्या कारवर दगडफेक केली. गोंधळ ऐकून गल्लीतील लोक आले तेव्हा मारेकरी पळाले. याआश्याची  तक्रार मयताचा  भाऊ  दिलीप धोत्रे यांने शहर ठाण्यात दिली आहे.त्या अकरा संशयित आरोपी विरुद्ध कलम
302,324,323,427,147,4,25  नुसार गुन्हा दाखल झाला असून हिम्मतसिंग उर्फ डागासिंग  यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे हे करत असून पो.ना.बदने हे सहकार्य करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा