Subscribe Us

header ads

नगराध्यक्ष डॉ स्वरुपसिंह हजारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल



बीड-: धारूर चे नगराध्यक्ष व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी गर्भवती महिलेला तपासताना अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ  उडाली आहे.डाॅ. स्‍वरूप सिंह हजारी (वय 60) वर्ष यांचे वर्चस्व धारूर नगरपालिकेत आतापर्यंत राहिलेला आहे. राजकारणाबरोबरच स्त्री रोग तज्ञ म्हणून देखील ते प्रसिद्ध असून शहरात ते खाजगी दवाखाना चालवतात मंगळवारी दुपारी १९ वर्षाची गर्भवती तपासणीसाठी आली होती.
यावेळी तिला सोनोग्राफी करायची असा बहाणा दाखवत मध्ये नेले. काही वेळातच डॉक्टरने तिच्याशी लगट करत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलला. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व ॲट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
 
धारूर डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशन चा बंद

धारुर येथील डॉक्टर असोसिएशनने हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. आज असोसिएशन च्या सर्व डॉक्टरांनी आपले वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवले असून व्यापारी असोसिएशन सुद्धा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन  तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा