Subscribe Us

header ads

केज तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकारीणी जाहीर


अध्यक्षपदी भाई मोहन गुंड तर कार्याध्यक्षपदी पत्रकार विनोद ढोबळे


केज :-  केज येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मार्गदर्शक प्रा. हनुमंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मनोहर जायभाये व राज्‍य निरीक्षक मनोहर जायभाये, सुधाकर तट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शासकीय विश्राम गृहावर आयोजित केलेल्या बैठकीत केज तालुका कार्यकरिणीची निवड करण्यात आली. बैठकीत केज तालुका अध्यक्षपदी भाई मोहन गुंड तर कार्याध्यक्षपदी पत्रकार विनोद ढोबळे यांची निवड करण्यात आली.या बाबतची माहिती अशी की दि. २० सप्टेंबर रविवार रोजी केज येथील विश्राम गृहावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्‍य निरीक्षक मनोहर जायभाये, सुधाकर तट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राध्यापक हनुमंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली केज तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती निवडी संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत केज तालुका अध्यक्ष म्हणून भाई मोहन गुंड यांची तर कार्याध्यक्षपदी पत्रकार विनोद ढोबळे व प्रधान सचिव पत्रकार विजयराज आरकडे  यांची निवड करण्यात आली. तसेच महिला अन्याय अत्याचार विरोधात काम करणाऱ्या सिताताई बनसोड, पत्रकार गौतम बचुटे, डॉ दिलीप चाळक, नासेर मुंडे, भागवत सोनवणे, प्रवीण शिंदे, यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडी करण्यात आल्या. या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपस्थितांनी परिसरात सुरु असलेल्या बुवाबाजी, जादूटोणा, महिलांचे शोषण त्याच बरोबर जादूटोणा व भानामती यासारखे प्रकार, अघोरी उपचार बंद करून त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत कार्यवाही करणे व त्यांचे बिंग उघडे पाडणे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच परिसरात असे प्रकार घडत असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा