Subscribe Us

header ads

नाळवंडी नाका ते चिंचोली (माळी) दहिफळ नाळवंडी या रस्त्याची दुरावस्था.प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.


 *प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे*
बीड_बीड तालुक्यातील नाळवंडी दहिफळ चिंचोली माळी फाटा रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने केवळ त्यांचे अवशेष शिल्लक राहिले आहे रस्त्या अभावी ग्रामस्थांना दवाखान्यात जाणं ही मुश्कील झाले असून एखाद्या रुग्ण रस्त्यातच दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तर बसही बंद करण्यात आली याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या परंतु तेही दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ आता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या तयारी असल्याची माहिती तरुणांनी दिली. नाळवंडी नाका ते नाळवंडी मार्गे असा हा रस्ता असून अनेक खेड्यांना जोडणारा रस्ता आहे. परंतु याकडे पुढाऱ्यांचे संबंधित कार्यालयाचे ही दुर्लक्ष असल्याने अनेक वर्षापासून या रस्त्यावर एक टोपले मुरूम टाकण्यात आलेला नाही त्यामुळे नाळवंडी फाट्यापर्यंत रस्ता पूर्णपणे उखडला असून अनेक मोठ मोठी खड्डे पडले असल्याने दुरावस्था झाली. खड्ड्यांमुळे चालकांना वाहन चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नेहमी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मणक्याचे आजार जडण्याची भीती आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याने राज्य परिवहन महामंडळाने नाळवंडी बस बंद केली आहे. तर खाजगी वाहनेही येथे येण्यासाठी तयार नाहीत . त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, खाजगी शिकवणी तसेच रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी अडचणी येतात. केवळ रस्ता नसल्याने खाजगी वाहन धारकांना अव्वाच्या सव्वा रक्कम मोजावी लागते वाहन मिळालं तरी ते रस्त्यात कुठे फस्त की काय? अशी भीती कायम मनात असते. रस्ता अभावी एखाद्या रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी येथील तरुणांनी व ग्रामपंचायतीने अनेक एक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने दिली. आमदार, जिल्हा परिषद सदस्यांसह सर्वांच्या भेटी घेऊन नाळवंडी ते नाळवंडी नाका फाटा दुरुस्त करण्याची मागणी केली. अनेकांनी आश्वासन दिले परंतु ते आश्वासन वांझोटी ठरली. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावरच आंदोलन करणार असल्याचे नाळवंडी परिसरातील तरुणांनी सांगितले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा