Subscribe Us

header ads

आयपीएल २०२१ स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध सनराइजर्स हैदराबाद

आयपीएल २०२१ स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध सनराइजर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. हैदराबादचा कर्णधार केन विलियमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादला पहिल्याच षटकात धक्का बसला आहे. डेविड वॉर्नर शून्यावर बाद होत तंबूत परतला आहे. अनरिच नॉरटीजेच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नरचा अक्षर पटेलने झेल घेतला.पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या संघाने ८ सामन्यात १२ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबादचा संघ ७ सामन्यात २ गुण मिळवत गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. दिल्ली संघाने हैदराबादल या सामन्यात पराभूत केल्यास गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानी विराजमान होणार आहे. आयपीएल इतिहासात दिल्ली आणि हैदराबाद संघ १९ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी ११ सामन्यात हैदराबादने विजय तर ७ सामन्यात दिल्ली विजयी झाली आहे. तर एक सामना अनिर्णित ठरला आहे. दुबईत यापूर्वी झालेल्या दोन सामन्यात हैदराबादने विजय मिळवला आहे.

दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), मारकस स्टोइनिस, शिम्रॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कगिसो रबाडा, अवेश खान, अनरिच नॉर्टजे
सनराईजर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर, वृद्धिमान साहा, मनिष पांडे, केन विलियमसन (कर्णधार), केदार जाधव, जेसन होल्डर, अब्दुल समाद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा