Subscribe Us

header ads

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी तांड्यावर रस्ते, पाणी पोहचले नाही. गोर सेनेच्या अमरण उपोषणाला वंचीतचा पाठींबा, प्रश्न मार्गी लावा अन्यथा राज्यभर आंदोलन करू

गेवराई / प्रतिनिधी_तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायत आंतर्गत येणाऱ्या काळू नाईक, बाला नाईक व मानसिंग नाईक तांड्यावर देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी अद्यापही दळवळनासाठी धड रस्ते नाहीत तर पिण्यायोग्य पाणिही मिळत नसल्याने महिलांना दोन किमी चिखलातून पायपिट करत  डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागत आहे.चकलांबा ग्रामपंचायत आंतर्गत येणाऱ्या या तिनही तांड्यावरील जनतेने अनेकदा निवेदने दिली मात्र प्रशासनातील काही  मुजोर निष्क्रिय अधिकऱ्यांनी त्या निवेदनाची दखल न घेतल्याने अखेर संयमाचा बांध फुटला आणि तांड्यावरील शेकडो महिलांनी एकत्र येत चकलांबा ग्रामपंचायतवर हंडामोर्चा धडकवला लागोपाठ गोर सेनेने राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा अध्यक्ष सतिष पवार मार्गदर्शनाखाली आमरण उपोषणाचे हत्यार उपसले या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीच्यावतिने युवा नेते रेवन गायकवाड, आनिल साळवे ईत्यादी वंचितच्या युवा कार्यकर्त्यांनी लेखीस्वरुपात जाहिर पाठींबा दिला.
 


बीड लोकसभेच्या सदस्य मा. प्रितमताई मुंडे यांना या भागातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. चकलांबा सर्कल हे नेहमिच मुंडे घराण्यावर प्रेम करत आले अनेक आडचनिच्यावेळी या भागातील वंजारा - बंजारा एकत्र येऊन मुंडे घराण्याची पाठराखण करत आले आहे. त्या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा. मुंडे लक्ष देतील का?



 तांड्यावरील लोकांचे जगणे मान्य करुन त्यांनाही माणसाप्रमाणे वागणूक देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून पालक मंञी यांनी पालकत्व स्विकारून न्याय द्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा