Subscribe Us

header ads

कोठरबन येथील विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू


प्रतिनिधी नवनाथ गोरे
🔶🔷🔶🔷🔶🔷

वडवणी_वडवणी तालुक्यातील कोठरबन येथील केशव बिबीशेन मुंडे (वय ३०) वर्ष हा तरुण शेतकरी रात्री शेतातील बोअरवेल चालू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोराचा शॉक लागला शॉक लागल्याने केशव याचा जागीच मृत्यू झाला.घटनेचे माहिती मिळताच घटनास्थळी वडवणी पोलीस ठाण्याचे अशोक आघाव हे दाखल होऊन पंचनामा करून केशव यांचा मृतदेह पोस्टमार्टम साठी चींचोन येथील  आरोग्य केंद्रात दाखल करून पोस्टमार्टम झाल्यानंतर केशव यांचा मृतदेह आज सकाळी घरच्यांच्या सावधानी देण्यात आला. शोकाकुल वातावरणात केशव यांचा आंतविधी आज सकाळी करण्यात आला आहे. वडवणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास अशोक आघाव हे करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा