Subscribe Us

header ads

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

माजलगाव_ वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जिवंत जाळण्याचा खळबळजनक प्रकार घडलाय. ही धक्कादायक घटना धारुर घाटात घडली असून अर्धवट जळालेल्या तरुणाचे नाव कृष्णा गायकवाड असे आहे. अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्यामुळे तरुणाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर या घटनेतील चार संशयित आरोपी फरार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा गायकवाड या तरुणाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे चार तरुण आले आणि त्याला धारुर घाटात घेऊन गेले. मात्र, वाढदिवस साजरा न करता गायकवाड या तरुणाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला वाढदिवशीच जिवंत जाळण्यात आले. यामध्ये कृष्णा गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.हा प्रकार समोर येताच चार जणांविरोधात दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून तपासाला सुरुवात केली आहे. संशयित चार आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे जखमी झालेल्या तरुणावर अंबाजोगाई येथे उपचार सुरु आहेत.दरम्यान, वाढदिवशीच एक तरुणाला जिंवत जाळून त्याची हत्या करण्याचे धक्कादयक कृत्य केल्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तरुणांनी हे कृत्य नेमके का केले ? या कृत्यामागे सुडाची भावना होती का ? असे प्रश्न विचारले जात आहे. फरार संशयित आरोपींनी हा प्रकार का केला याचा अद्याप सोध लागला नसून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा