पाटोदा_दि.१८ सप्टेंबर रोजी पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ महामार्गावरील पडलेल्या भेगा प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांनी नितिन गडकरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री व अरविंद काळे, प्रकल्प संचालक यांना लेखी तक्रार केल्यानंतर संबधित प्रकरणात बीड जिल्ह्य़ातील सर्वच दैनिकात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पंकजाताई मुंढे यांनी नितिनजी गडकरी यांना या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ट्वीट करून नितिनजी गडकरी यांना सुद्धा अशा प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम सहन होणार नाही म्हटले होते त्यानंतर गडकरी यांच्या कार्यालयाकडून संबधित प्रकरणात ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देत खराब रस्ते दुरूस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे असे आदेश देण्यात आल्यानंतर आजपासुन काम सुरू झाले आहे.
पंकजाताईंचे आभार, पालखीमार्गा प्रमाणेच सावरगाव घाट ऊर्फ भक्तिगड रस्ताकामात लक्ष द्यावे:-डाॅ.गणेश ढवळे
ज्याप्रमाणे पंकजाताई मुंढे यांनी पैठण-पंढरपुर पालखी मार्गावरील निकृष्ट रस्त्याप्रकरणात लक्ष दिले त्याचप्रमाणे सावरगावघाट-मुगगाव-ब्रम्हगाव 8 किलोमीटर लांबीचे रस्तादुरूस्ती अंदाजे किंमत 4 कोटी 43 लाख रूपये अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून संबधित प्रकरणात पंकजाताई व प्रितमताई यांना 8-10 वेळा निवेदन देऊन सुद्धा आ. सुरेश आण्णा धस यांच्या कार्यकर्त्याने निकृष्ट दर्जाचे काम केले असून संबधित प्रकरणात लक्ष देऊन चांगला रस्ता करून घेण्यात यावा अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
0 टिप्पण्या