Subscribe Us

header ads

रंगतदार सामन्यात राजस्थानचा पंजाबवर विजय, शेवटच्या षटकात फिरला सामना

पंजाब किंग्सने पुन्हा एकदा हातात आलेला सामना गमावला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबचा   2 रनने पराभव झाला आहे. राजस्थानने ठेवलेल्या 186 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात धडाक्यात झाली. केएल राहुल  आणि मयंक अग्रवाल या दोघांनी पंजाबला शतकी ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. पंजाबला 15 बॉलमध्ये 10, 12 बॉलमध्ये 8 आणि अखेरच्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन हवे होते, पण कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi) शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिली आणि 2 विकेट घेतल्या. राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबच्या सुरुवातीच्या चारही बॅट्समनना चांगली सुरुवात मिळाली होती.मयंक अग्रवालने 43 बॉलमध्ये सर्वाधिक 67 रन केले होते. तर केएल राहुलने 49, एडन मार्करमने नाबाद 26, निकोलस पूरनने 32 रन केले, तरीही पंजाबला पराभवाचा धक्का बसला. राजस्थानकडून कार्तिक त्यागीला 2 विकेट मिळाल्या, तर चेतन सकारिया आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून राजस्थानला पहिले बॅटिंगला बोलावलं. यानंतर राजस्थानने धडाक्यात सुरुवात केली. 14 व्या ओव्हरमध्येच राजस्थानचा स्कोअर 130 च्याही पुढे होता, त्यामुळे राजस्थान 200 चा टप्पा गाठेल असं वाटतं होतं, पण अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) बॉलिंगपुढे राजस्थानची बॅटिंग गडगडली आणि त्यांचा 20 ओव्हरमध्ये 185 रनवर ऑल आऊट झाला. अर्शदीप सिंगने 5 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीला 3 आणि इशान पोरेल, हरप्रीत ब्रारला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.पंजाबविरुद्धच्या या विजयासह राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. राजस्थानने 8 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर दुसरीकडे पंजाबची टीम सातव्या क्रमांकावर आहे. पंजाबने 9 पैकी 6 सामने गमावले असून 3 मध्ये त्यांचा विजय झाला. राजस्थानच्या खात्यात आता 8 तर पंजाबच्या खात्यात 6 पॉईंट्स आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा