Subscribe Us

header ads

पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई-: माझे पैसे का देत नाहीस असे म्हणत मारहाण झाल्याचा प्रकार सहन न झाल्यामुळे 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाईतील परळी वेस भागात सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या घाटनांदूरच्या तरूणावर गुन्हा नोंदविण्यात आला.
सूर्यकांत रमेश वैद्य वय 25 वर्ष असे मृत तरुणाचे नाव आहे. सूर्यकांत वैद्य हा भजन गायनाचे कार्यक्रम करत असे. सूर्यकांत वैद्य यास घाटनांदूर येथील महेश सतीश शिंगनाथ याने माझे पैसे का देत नाहीस असे म्हणत मारहाण केली. सोबतच जीवे मारण्याची धमकी देखील दिली. सूर्यकांत घरी आला असता त्याचा भाऊ दिनेश याने डोळ्याला मार लागल्या संदर्भात विचारणा केली. यावेळी सूर्यकांत ने सर्व हकीकत सांगितली. आपण पैशाची व्यवस्था करून त्याचे पैसे देऊ अशी समजूत दिनेश ने काढली. परंतु झालेला अपमान सहन न झाल्यामुळे शेवटी सूर्यकांत ने राहत्या घराच्या लोखंडी अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली ‌ याप्रकरणी दिनेशच्या फिर्यादीवरून महेश शिंगनाथ याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा