Subscribe Us

header ads

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा – खा. प्रितम मुंडे

बीड-:खरिपातील पिकांना बहर आलेला असतानाच अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.
पेरणीपूर्वी आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते,यंदा पावसाने दिलेल्या साथीमुळे चांगले पीक येण्याची चिन्हे असतानाच अवेळी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली.
जिल्ह्याच्या बहुतांश भागात पिकांचे नुकसान आणि घरांची पडझड झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.सतत अस्मानी संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या चिंतेकडे वेधले.नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा