Subscribe Us

header ads

काळ खूप कठीण आहे रक्तदाब व शुगर नियंत्रणात ठेवा--- डॉ अरुण मोरे


  प्रतिनिधी डॉ. शहाजी चंदनशिवे 

परंडा - दिनांक 28 सप्टेंबर 2021, काळ खूप कठीण आहे रक्तदाब व शुगर नियंत्रणात ठेवावा असे प्रतिपादन  उस्मानाबाद येथील मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे डॉ अरुण मोरे यांनी शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले. डॉ. अरुण मोरे जागतिक ह्रदय दिन व राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या अनुषंगाने आयोजित चर्चा सञाचे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा सावळे या उपस्थित होत्या तर व्यासपीठावर आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ. महेशकुमार माने, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अतुल हुंबे, डॉ. शहाजी चंदनशिवे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन चव्हाण उपस्थित होते. महाविद्यालयामध्ये दिनांक 27 आणि 28 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय मोफत आरोग्य  शिबिर आयोजित केले होते. दिनांक 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिवस आणि 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते .यामध्ये बी पी, शुगर,  ईसीजी इत्यादी तपासणी करण्यात आल्या. महाविद्यालयातील आई क्यू एस सी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आई क्यू एस सी चे चेअरमन महेश महेशकुमार माने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन चव्हाण, प्रा सचिन साबळे यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्टचे कर्मचारी पद्माकर लाकाळ, ओंकार इंगळे आणि धर्मराज गरड यांनी सहकार्य केले. दिनांक 27 सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांच्या हस्ते करण्यात आले. 28 सप्टेंबर रोजी प्राणिशास्त्र विभाग आयोजित Initiative  to Prevent Diseases या विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आले .यामध्ये डॉ अरुण मोरे आणि डॉ सौ. स्वाती जाधव-हुंबे  रामकॄष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. डॉ अरुण मोरे यांनी ऑफलाईन व्याख्यान दिले तर डॉ स्वाती जाधव यांनी ऑनलाईन व्याख्यान दिले. या व्याख्यानाच्या प्रसंगी प्राचार्या डॉ दीपा सावळे, डाॅ महेशकुमार माने, डॉ सचिन चव्हाण, डॉ शहाजी चंदनशिवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले अध्यक्षीय समारोप प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी केला, त्या म्हणाल्या की एका ग्रामीण भागातून स्वतःच्या कर्तुत्वाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आपली ओळख डॉ अरुण मोरे यांनी निर्माण केली आहे त्याबद्दल यांचे कौतुक आहे ते समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. डॉ मोरे यांचे MHDC ऍप जे की त्याच नावाने प्लेस्टोर वर आहे, ते आपल्याला घरी बसून बी पी आणि शुगर ची ट्रीटमेंट ची सोय आपल्याला देते जेणेकरून कोविड च्या या घातक काळात आपल्याला आपला बी पी आणि शुगर ला नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. राष्ट्रीय चर्चा सञामध्ये देशातून एकूण 130 प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता तर मोफत तपासणीत 60 लोकांनी आपल्या विविध तपासणी करून डाॅ अरूण मोरे यांचे मार्गदर्शन घेतले. शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ अतुल हुंबे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा