Subscribe Us

header ads

बालसंस्कार मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न; योगगुरु अर्चना सोनार यांच्या प्रयत्नास उत्स्फुर्त प्रतिसाद.

 वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,(मुक्त पत्रकार)
----------------------------------------


पुणेः-आजच्या या धावपळीच्या जीवनात व कोरोना कालखंडात बालकांना योग्य संस्कार असावेत.त्यामुळे ही नवीन पीढी राष्ट्रहित जोपासुन आपले जीवन सार्थक करुन घेईन.या उद्देशाने योगगुरु सौ.अर्चना सोनार यांनी स्थापन केलेल्या अध्यात्मिक गजानन ग्रुपच्या माध्यमातून आॕनलाईन बालसंस्कार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करुन बालसंस्कार केंद्राचे उद् घाटन जाहीर केले. शिबीर विविध गुणदर्शन,मार्गदर्शनाने संपन्न झाले.योगगुरु सौ.अर्चना ईश्वर सोनार संचालिका असलेल्या *अध्यात्मिक गजानन ग्रुप*  द्वारे ज्ञान,विज्ञान,विचार,प्रबोधन ,माहिती मिळते.बालकांना त्यांच्या संस्कारात आधिक माहिती मिळावी त्यासाठी सामाजिक दृष्टिकोन ठेवुन  *बालसंस्कार वर्ग*  असावे या संकल्पनेतुन नुकतेच आॕनलाईन बालसंस्कार शिबिराचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मान्यवर मार्गदर्शकांनी केले. या शिबीरात प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणुन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई सोनार, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र कपिले,धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते  संतोष टाक ,संजय चिंतामणी ,युवा सामाजिक कार्यकर्ते  दिपक जडे, प्रसिद्ध  उद्योजक नितिन बागुल,समुपदेशक श्यामसुंदर विसपुते ,रुग्वेद चे संचालक दिनेश येवले, मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई उदावंत आदी मान्यवर उपस्थित होते.बालसंस्कार मार्गदर्शन शिबीरात मान्यवरांनी विविध विषयानुसार मार्गदर्शन केले.यामध्ये प्रामुख्याने विद्या हा मानवाचा तिसरा डोळा आहे.यासाठी संस्कारास उजाळा देण्याचे कार्य पालकांनी करावे.तर सामान्य ज्ञान हा मुलांसाठी अविभाज्यअंग आहे. त्याच्या वाढीसाठी प्रयत्न असावेत .सामान्यज्ञान वाढीसाठीच मोबाईलचा वापर मुलांनी करावा.आई ,वडिलांची सेवा यामुळेच बालसंस्कार दिसतात.जनसेवा हिच ईश्वरसेवा असुन समाजसेवा व संतसेवा म्हणजे योग्य संस्काराचे प्रतिक आहे.जीवनात सुपर,स्पायडर मॕन होणे असेल तर पालकांकडून बालकांना योग्य संस्कार मिळावेत.बालसंस्कार ही काळाची गरज आहे.अशा अनेक उदाहरणानुसार मार्गदर्शन झाले.याप्रसंगी मनोरंजनात्मक काव्यही बालकांसाठी सादर करण्यात आले.कार्यक्रमाचा प्रारंभ अवनी दुसाने हिने सादर केलेल्या गणपती स्तोत्राने करण्यात आला.कार्यक्रमात प्रामुख्याने आस्था बोरसे हिने"मी जिजाऊ बोलते" यावर हुबेहुब वेशभुषा परिधान करुन एकांकिका सादर केली.तर हिमानी जोशी ने"भगवतगीताचा पंधरावाअध्याय तोंडपाठ म्हटला. अभिनीत बोरसे याने "छत्रपती शिवाजी महाराज " यांच्यावर पोवाडा सादर केला.आयुष जाधव याने सद्य पीढीवर विचार मांडले.प्रीती का मंडल हिने पर्यावरणावर कविता सादर केली.श्लोक बागुल याने " बालसंस्कारावर बोधकथा सादर केली.प्रामुख्याने या शिबीरात पालकांनीही आयोजनाबद्दल आपल्या मनोगतातुन  समाधान व्यक्त केले. योगगुरु सौ.अर्चना सोनार यांनी  बालसंस्कार केंद्राची संकल्पना सादर केल्याबद्दल अनेकांनी कौतुक करुन अभिनंदन केले.संपुर्ण शिबीराचे सुत्रसंचलन त्यांनी उत्कृष्ठरित्या सांभाळले.शिबीर प्रसंगी गजानन स्तोत्राचा उच्चार दिपक जडे यांनी करुन आपल्या मनोगतातुन या अध्यात्मिक उपक्रमास आपले सर्वोतोपरी सहकार्य  असेल यावेळी ग्वाही दिली.तसेच रुग्वेद न्युज चॕनेलच्या वतीने या बाल संस्कार केंद्रातील बालकांच्या सुप्त गुणांना  सादरीकरणात सदैव सहकार्य असेल असे संचालक दिनेश येवले यांनी यावेळी  आश्वासन दिले.शेवटी आत्माराम ढेकळे यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा