Subscribe Us

header ads

काका - पुतण्याच्या श्रेयाच्या लढाईत प्रभागाचा विकास खोळंबला; हौसेने केला पती त्याला फुटली रगटपती :- तांबे, डोरले

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

बीड (प्रतिनिधी) :- बीड शहरातील काका पुतण्याचे वाद आता बीडकराना नवीन राहिलेले नाहीत, एकाने मारल्यासारखे करायचे तर दुसऱ्याने थोपटायचे अश्यातला प्रकार सध्या बीड शहरातील नागरिकांसोबत केला जात आहे.बीड नगर पालिकेत सत्ताधीश असलेल्या या काका पुतण्याच्या वादात अनेक विकास कामे हे अपूर्ण अथवा रोखले जात आहेत.बीड शहरातील विकास कामांसाठी आग्रही भूमिकेत राहणारी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने गेल्या कित्येक वर्षांपासून प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत असणाऱ्या राज हॉटेल ते भाजी मंडई कॉर्नर या रस्त्याच्या नुतनीकरण व पूर्णत्वास नेण्यासाठी नगर पालिका प्रशासन व मुख्याधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा करत असल्याने नगर पालिका प्रशासनाकडून निविदा काढण्यात आली होती परंतु शहराचे उपनगराध्यक्ष व प्रभागाचे नगरसेवक असलेल्या आमदार बंधूनी श्रेयासाठी विद्यमान आमदारांना पुढे करत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून या रस्त्याची काढलेली निविदा रद्द केली असून यामुळे रस्त्याचां होणारा विकास रोखला खोळंबला गेलेला आहे, प्रभागातील नागरिकांनी विकासाच्या मोठ्या आशेने आमदार बंधूना निवडून दिले होते, परंतु होसेने केला पती आणि त्याला फुटली रगतपिती असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे.विद्यमान नगरसेवकच  विकासाच्या कामात अडथळा आणत असल्याने नागरिकांवर बोंब मारण्याची वेळ आलेली आहे, राज हॉटेल ते भाजी मंडई कॉर्नर ह्या रस्त्याच्या मध्ये शहरातील नामांकित रुग्णालय, पत्रकार भवन, विद्यालय तसेच भाजी मंडई असल्याने रोडवर सतत गजबज असते, त्यात रस्त्याला जागोजागी ठिगळे पडल्याने रुग्णांची ने आन करताना नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, त्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या या गैरसोयीला त्रासून बीड नगर पालिका व आमदार व विद्यमान नगरसेवक यांच्या विरोधात नागरिकांना सोबत घेऊन येत्या काही दिवसात शिवसंग्राम मोठ्या प्रमाणावर आंदोलन करेल अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना शिवसंग्राम च्या वतीने सादर केल्याचे शिवसंग्राम चे शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे व युवक अध्यक्ष प्रशांत डोरले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा