Subscribe Us

header ads

आ. संदिप भैय्या पवार साहेबांचे सर्वात लाडके आमदार -ना. जयंत पाटील बुथ कमिट्या मजबुत करा; कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही पडत्या पावसातही राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेला बीडमध्ये प्रचंड प्रतिसाद

बीड (प्रतिनिधी):- मागील निवडणूकीत पक्षाने युवकांना संधी दिली, आ.संदिप भैय्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत लहान वयात मोठा पराक्रम करून कार्यकर्त्यांच्या विश्वासावर विधानसभेचा मतदार संघ खेचून आणला. आ.संदिप भैय्या क्षीरसागर बिंदूसराच्या नदीवरील पुलासाठी, खांडेपारगाव साठवण तलावाऐवजी निम्न पातळी बंधारे करण्यासाठी आग्रही आहेत. आ.संदिप भैय्यांचे सर्व विकासाचे प्रश्न येत्या काळात सोडवले जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आणि पक्ष आ.संदिप भैय्यांच्या सोबत आहोत. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या पाठिशी पवार साहेब यांची ताकद असून आ.संदिप भैय्या क्षीरसागर पवार साहेबांचे लाडके आमदार आहेत. बीड मतदार संघाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, येत्या काळात बुथ कमिट्या मजबुत करा, रचना आणि त्याचा विस्तार करत सर्वसामान्य लोकांची कामे व प्रश्नांची सोडवणूक करत रहा, कोणतीही शक्ती निवडणूकीत तुम्हाला हरवू शकत नाही असे प्रतिपादनही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. भरपावसातही राष्ट्रवादी काँग्रेस परिवार यात्रेला बीडमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. या यात्रेचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा बीडमध्ये 

मंगळवारी दि.28 सप्टेंबर 2021 रोजी आल्यानंतर राष्ट्रवादी भवन बार्शी  रोड,बीड येथे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बीड मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदार संघाचा बुथनिहाय आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी खा.जयसिंगराव गायकवाड, पक्ष निरीक्षक जीवनरावजी गोरे, प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.अमरसिंह पंडित, युवकचे अध्यक्ष शेख महेबुब, युवतीच्या अध्यक्षा सक्षनाताई सलगर, विद्यार्थीचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, अ‍ॅड.डी.बी.बागल, माजी आ.पृथ्वीराज साठे, सुरज चव्हाण, युवकचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, कल्याण आखाडे, महिला अध्यक्षा तुपसागरताई, प्रज्ञा खोसरे, माजी जि.प.अध्यक्ष शिवाजी राऊत यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, विधासभा अध्यक्ष मदन जाधव, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, युवक अध्यक्ष नंदु कुटे व विविध आघाड्यांकडून पक्ष सेलच्या तालुकाध्यक्षांकडून बीड मतदार संघातील आढावा घेतला. यावेळी बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आ.संदिप भैय्या नेहमी बीड मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्नशिल असतात, त्यांच्या प्रयत्नातून 
बीड शहरातील बायपास टू बायपास रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पाऊस संपला की काम सुरू होईल नऊ महिन्यानंतर काम पुर्ण झाल्यानंतर खरा विकास बीडकरांना दिसेल. या कामासाठी आ.संदिप भैय्यांनी पवार साहेब, नितीन गडकरी यांच्याकडे आग्रह धरला. 


तेंव्हा हे काम मंजुर झाले. बिंदूसरेच्या नदीवरील पुलाचा प्रश्नही लवकर मार्गी लावू चिंता करू नका, हा दौरा मंत्री मंडळाची बैठक असल्याने पुढे ढकलला होता. परंतू जनतेची भावना लक्षात घेता मंत्री मंडळाची बैठक रद्द केली आणि येथील जनतेशी संवाद साधायला आलो आहे. येत असतांना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांचे कापूस, तूर, सोयाबीन पुर्णपणे वाया गेले आहे. शेतकर्‍याला मदत देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे. सरकार तीन पक्षाचं आहे, पक्ष हा पक्ष म्हणून चालला पाहिजे, तालुकाध्यक्ष, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष यांनी जनतेचे प्रश्न आमदार, मंत्री यांच्याकडे सोडवण्यासाठी दिले पाहिजेत. बुथ कमिट्या सक्रीय करा, मेळावे घ्या यामुळे चैतन्य आणि उत्साह कायम राहिल. संघटनेत चैतन्य महत्त्वाचे असते, येत्या काळात संघटना मजबूत करू या, सत्तेत असतांना संघटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संघटना व संघटनेचे सर्व सेल महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बुथ कमिट्या मजबुत करा, येणार्‍या निवडणूकांमध्ये तुम्हाला कोणतीच शक्त हरू शकणार नाही असे बोलत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या भाषणाचा धागा पकडून जयंत पाटील म्हणाले की, आ.संदिप भैय्या तुम्ही वयाने लहान आहात, परंतू या लहान आमदाराच्या पाठिशी प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी व पक्ष आणि सर्वात मोठी पवार साहेबांची ताकद तुमच्या पाठिशी आहे. येत्या काळात बीड मतदार संघाचा विकास करण्यासाठी बीड शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाहीही यावेळी जयंत पाटील यांनी दिली.

नुकसानीचे महसूलचे पंचनामे ग्राह्य धरून पीक विमा
कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी -आ.संदिप भैय्या क्षीरसागर

मागील काही दिवसात आणि आत्ता झालेल्या पावसामुळे मतदार संघातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पीके पुर्णपणे वाया गेली आहेत, शेतजमिनी खचल्या आहेत याचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचनामे केले. काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत, शासन शेतकर्‍यांना शंभर टक्के मदत देईल परंतू पीक विमा कंपन्या यात खोडसाळपणा करत आहेत. पीक विमा कंपन्यांच्या जाचक अटीमुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत नाही. शेतकर्‍यांना पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी महसूलने केले पंचनामे ग्राह्य शासनाने पीक विमा कंपन्यांना शेतकर्‍यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यास भाग पाडावे अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी केली.

नगर पालिका, जिल्हा परिषद पुर्ण ताकदीने लढु,विजय निश्चित!

विधानसभा निवडणूकीत काही नसतांना सामान्य जनतेने प्रेम दिलं. येत्या काळात होणार्‍या नगर पालिका, जिल्हा परिषद व इतर निवडणूका सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर ताकदीने लढू आणि या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करत पक्षाशी प्रामाणिक असणार्‍या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाईल असे देखिल आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात म्हटल्यानंतर राष्ट्रवादी भवन सभागृहात प्रचंड टाळ्यांचा गडगडाट आणि उत्साह पहावयास मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा