Subscribe Us

header ads

पारनेरमध्ये जमावांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पारध्यांच्या त्या मयतांवर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

पाटोदा_पाटोदा तालुक्यातील पारनेरमध्ये जमावाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पारधी समाजातील अभिमान पांजऱ्या काळे व सिध्दांत काळे या बालकावर मंगळवारी रिमझिम पावसात तगड्या पोलीस बंदोबस्ता अंत्यसंस्कार करण्यात आले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पावसात भिजत पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,एपीआय धरणीधर कोळेकर, पीएसआय पठाण हे आपल्या फौजफाट्या सह घटनास्थळी हजर होते.पाटोदा तालुक्यातील पारनेरमध्ये जमावाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पारधी समाजातील अभिमान पांजऱ्या काळे व सिध्दांत काळे या बालकावर मंगळवारी रिमझिम पावसात तगड्या पोलीस बंदोबस्ता अंत्यसंस्कार करण्यात आले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पावसात भिजत पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,एपीआय धरणीधर कोळेकर, पीएसआय पठाण हे आपल्या फौजफाट्या सह घटनास्थळी हजर होते.



पारनेरमध्ये जमावाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या सिध्दांत काळे व अभिमान काळे यांचा अंत्यविधी त्यांच्या नातेवाईकांनी रितीरिवाज प्रमाणे अग्नी डाग न देता दफनविधी केले .


पारनेरमध्ये मध्ये शनिवारी रात्री जमावाने पारधी वस्तीवर हल्ला केला होता.या हल्ल्यात प्रथम एक वर्षीय बालक सिध्दांत अरुण काळे यांचे निधन झाले होते.तर दुसऱ्या दिवशी अभिमान पांजऱ्या काळे वय ७० यांचे निधन झाले.यामुळे पारनेरमध्ये परिस्थिती गंभीर निर्माण झाली होती.

मंगळवारी या दोन्ही मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मयत सिध्दांत या मुलाची आई व अभिमान काळे यांच्या पाच बहिणी व भाऊ मेव्हणे असे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.मयतांना अखेरचा निरोप देतांना मयतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता .पारनेरमध्ये जमावाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या आजोबा व नातवा वर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांची डेथ बॉडी पारनेरमध्ये मंगळवारी पारधी वस्तीवर आणण्यात आली. यावेळी गावातील एकही नागरिक या ठिकाणी काळे कुटुंबांच्या दुखात सहभागी दुखात सहभागी झाले नाही. अंत्यविधी ठिकाणी नातेवाईक व पोलीस प्रशासन ,ग्रामसेवक ,तलाठी ,वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोरख झेंड ,हेच या ठिकाणी दिसुन आले .पारनेरमध्ये पारधी वस्तीवर जमावाने केलेल्या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी सोमवारी बीडचे पोलीस अधीक्षक आर.राजा.अप्पर पोलीस अधिक्षक लांजेवार यांनी देखील भेट दिली होती.पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील ,एपीआय धरणीधर कोळेकर ,पीएसआय पठाण पोलीस कर्मचारी सुनिल सोनवणे ,बाळू सानप ,बळीराम काथखडे ,डोके ,गुरसाळे ,टेकाळे ,तांबे सह आदींनी तात्काळ तत्परता दाखवत जमावातील सात जणांच्या मुसक्या आवळल्या मुळे परिस्थिती हाता बाहेर गेली नाही.उर्वरित आरोपींचा शोध डीवायएसपी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटोदा पोलीस ठाण्याचे पीआय मनिष पाटील हे घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा