Subscribe Us

header ads

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत द्याआ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी कृषी मंत्री दादा भुसेंची घेतली भेट

बीड (प्रतिनिधी):- सलग तीन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पीकांचे शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले असून शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.
बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर कासार तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची पाहणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी थेट बांधावर जावून केली आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करण्याचे आदेश देत स्वत: बांधावर उतरून पाहणी केली. शेतकर्‍यांच्या शासन पाठिशी असून लवकरच मदत दिल्या जाईल अशी ग्वाहीही ना.धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. बीड तालुक्यात व शिरूर कासार तालुक्यात शेतकर्‍यांच्या नुकसानीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मुंबई येथे राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेवून केली आहे. शेतकर्‍यांच्या मागण्या आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी शासन दरबारी मांडल्या आहेत.


ई-पीक पाहणी अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी दूर करा


शेतकर्‍यांच्या दृष्टीने पीक पेरा नोंद ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आता ई-पीक पाहणी अ‍ॅप माध्यमातून शेतकर्‍यांना पीक पेरा नोंदणी ऑनलाईन करावी लागते. माझी शेती, माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या प्रमाणे शेतकरी पीक नुकसानीची माहिती व नुकसानीचे फोटो अपलोड करत असतांना या अ‍ॅपमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. यातील अडचण तात्काळ दूर कराव्यात अशी मागणीही यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा