Subscribe Us

header ads

सर्व धर्मगुरूंना मोफत तर सामान्य नागरिकांना ५० रुपयांत इलाज ; जनसेवा चॅरिटेबल क्लिनिक चा स्तुत्य उपक्रम !

माजलगाव प्रतिनिधी/ दि ८ _ सामान्य माणसांना दवाखान्याचे नाव जरी घेतले तरी अंगावर  काटा उभा राहतो महागडे इलाज आणि औषध  गोळ्या घेणे आज कुठल्याही माणसाच्या खिशाला परवडणारे नाही पण  चक्क केवळ ५० रु तपासणी व औषध गोळ्या देऊन इलाज करणे आता शक्य  करून दाखवले आहे येथील सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील पटेल या तरुण युवकाने आणि सर्व धर्म गुरूंना औषध  गोळ्या त्याही अगदी मोफत !
हो हे खरं आहे आज  सामान्य माणसांना कोणत्याही दवाखान्यात जाऊन इलाज करून घेणे सोपे राहिले नाही महागडी औषध ,गोळ्या ,रक्त तपासणी  आदी वर खूप मोठा खर्च होत आहे  गोरगरीब लोकांना हा खर्च करणे शक्य नसल्याने अनेक गरीब रुग्णांना वेळ प्रसंगी आपला जीव गमवावा लागत असल्याच्या अनेक घटना आपण रोज ऐकत आलो आहोत मात्र आता केवळ ५० रु इलाज तेही गोळ्या औषध आदी सह  विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे माजलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील पटेल या तरुणांनी ही किमया करून दाखवली आहे जनसेवा चॅरिटेबल क्लिनिक च्या माध्यमातून ! शहरात दोन ठिकाणी त्यांनी सुसज्य बेड ची व्यवस्था असलेली  रुग्णालयविविध मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू केली आहेत यात तज्ञ डॉक्टर रुग्णांवर इलाज करणार आहेत  केवळ ५०  रुपयांत औषध गोळ्या  त्याही दर्जेदार कंपनीच्या तर सर्व जाती धर्माच्या धर्म गुरुवार अगदी मोफत इलाज  करण्यात येणार असल्यावर मुजम्मील  पटेल यांनी सांगितले  सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या व इतर तपासण्या निम्म्या दरात केल्या जातील तर भविष्य मोठी मोठी ऑपरेशन व प्रसूती गृह सुरू करण्याचा पटेल यांच्या मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा