Subscribe Us

header ads

करुणा शर्मा यांच्या मुंबई निवासस्थानी बीड पोलीस दाखल तर सर्च ऑपरेशन सुरू!

बीड-:करुणा शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात बीड पोलिसांचं एक पथक करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे. सकाळी हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीनं पुढील तपास करण्यात येत आहे. बीड पोलिसांकडून करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन केलं जात आहे. करुणा शर्मा या रविवारी परळीमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीत एक पिस्तूल आढळून आलं होतं.

बीड पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल झालं

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल आढळल्यानंतर त्यांच्या गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर करुणा शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टानं 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्या बीड जिल्हा कारागृहात आहेत. त्यानंतर आज बीड पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल झालं आहे. करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी बीड पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. आता शर्मा यांच्या घरातून पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सध्या दोन्ही आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात

मंगळवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने अरुण मोरेची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सध्या दोन्ही आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत. बुधवारी दोन्ही आरोपींनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, दरम्यानच्या काळात सुट्या येत असल्याने त्यांच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे करुणा शर्मांना किमान मंगळवारपर्यंत कोठडीत राहावे लागणार हे निश्चित झाले आहे.

नेमकं काय घडलं होतं?

शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.

व्हायरल व्हिडीओत काय?

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

करुणा शर्मांची तक्रार

परळीत आल्यानंतर आपल्या अंगावर जमाव धावून आला होता, अशी तक्रार शर्मा यांनी परळी शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शहरात प्रवेश केल्यानंतर जमावाने त्यांची गाडी रोखली होती. काही क्षण ही गाडी थांबल्यानंतर त्या परत निघून गेल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा