Subscribe Us

header ads

नरेंद्र मोदी देशाचे नव्हे कॉर्पोरेट घराण्यांचे प्रधानसेवक; फारूख अहमद


नांदेड/प्रतिनिधी: प्रधानमंत्री मोदी देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करीत असल्याच जो दावा करीत आहेत, तो निव्वळ फसवा असून या दाव्याआडून ते भारतीय जनतेची फसवणुक करीत आहेत. मोदींचे आर्थिक विकासाचे धोरण पाहिले की त्यांना देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावयाचे आहे की अडाणी अंबानी सारख्या विशिष्ट कॉर्पोरेट घराण्यांचे? असा प्रश्न पडतो अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद यांनी ‘वंचितनामा’शी बोलतांना दिली.पुढे बोलतांना फारूक अहमद म्हणाले की, देशाची कोरोनाच्या पुर्वी आणि नंतरही जिडीपीची ग्रोथ वाढलेली तर नाहीच परंतु अंशत:ही समाधानकारक नाही. एकीकडे महागाई वाढलेली आहे, जिडीपी ग्रोथ संदर्भात आकडेवारीमध्ये मिडिया संभ्रम निर्माण करीत आहे. जेव्हापासून मोदीजी प्रधानमंत्री झाले तेव्हापासून देशाच्या जिडीपी ग्रोथ पेक्षा मोदींच्या मित्रपरीवाराचा आर्थीक आलेख हा सातत्याने वाढत आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अंबानी, अदानी यांचा समावेश असल्याचं त्यांनी यावेळी सांगीतलं.

दोन्ही सरकारे जनविरोधी

केंद्र आणि राज्य सरकार ही दोन्ही सरकारे जनविरोधी असल्याची टीका फारुक अहमद यांनी केली. ते म्हणाले की, ज्या पद्धतीने केंद्र सरकारने पेट्रोल, डिझल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तुंवर कर आकारून सामान्य जनतेच्या खिशावर डल्ला मारला आहे अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारनेही जनतेच्या हितासंबंधी धोरणात्मक पावित्रा घेतलेला नाही. कोरोनाच्या सारख्या अत्यंत कठीण प्रसंगातही वीज बीलात महाराष्ट्र सरकारकडून जनतेला दिलासा मिळू शकला नाही. रोजगाराच्या संधी निर्माण करता आल्या नाही. पेट्रोल दराच्या बाबतीत पश्चिम बंगाल सरकारसारखा राज्यातचा अधिभार (सेस) कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारला घेता आला असता, परंतु त्यांनी तसे केले नाही. एकुणच केंद्र आणि राज्य सरकार जनविरोधी असून विरोधी पक्षही सक्षम पद्धतीने भुमिका घ्यायला तयार नाही. कोणी भुमिका घेतली तर त्याला ईडीची भीती दाखविल्या जाते. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई निर्देशांकामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. दोन्ही सरकारांचे वास्तव फक्त वंचित बहुजन आघाडीच रस्त्यावर उतरुन उघडे पाडत आहे म्हणुन ख-या विरोधीपक्षाची भुमिका वंचितच पार पाडत आहे ही बाब जनतेच्या ही लक्षात यायला लागले असून जनता आता सावध होवून ‘वंचित बहुजन आघाडी’ हा तिसरा पर्याय निवडण्याच्या तयारीत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

*माध्यमांची भुमिका दिशाभूल करणारी*

माध्यमांवर मोठी जबाबदारी असते. परंतु सत्तेशी हातमिळवणी केल्यामुळे माध्यमांचा आवाज दबला आहे. सरकारला त्याच्या कामाची आणि सरकार काम करीत नसेल तर विरोधी पक्षाला त्यांची भुमिका समाजावून सांगणे ही माध्यमांची जबाबदारी आहे परंतु जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याऐवजी मीडिया मात्र नारायण राणे व उध्दव ठाकरेंची कोंबडा-कोंबडीमध्ये जनतेला गुंतुन ठेवत असल्याचा आरोप फारुक अहमद यांनी केला.

*सरकारने मुद्रा योजनेचा मुडदा पाडला*

नव्याने व्यावसायामध्ये उतरणा-या व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आलेली मुद्रा योजना सपशेल फेल झाली आहे. या योजनेद्वारे सरकारकडून जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणुक चाललेली आहे. सामान्य माणूस बॅंकेमध्ये फे-या मारून वैतागला असून सत्ताधा-यांच्या नातलगांना, वशिलेबाजांनाच कर्ज दिल्या जात आहे. काही लोकांनी तर गैरमार्गाने या योजनेचा लाभ घेतला असल्याचा आरोप यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूख अहमद यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा