Subscribe Us

header ads

अखेर ‘त्या’ बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला

 प्रतिनिधी नवनाथ गोरे

बीड : कपिलधारचा धबधबा पाहण्यासाठी गेलेले दोन मुले वाहून गेली होती. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले, मात्र एकजण वाहून गेला होता.कालदुपारी बीड येथील दोन तरुण कपिलधार येथे फिरायला गेले होते.  यशराज राहुल कुडके. वय 17 वर्ष आणि ओंकार विभुते वय 17 वर्ष हे दोघे मोटारसायकल ने कपिलधार येथे धबधबा पाहण्यासाठी जात असताना पुलावरून पाणी वाहत होते.तरी देखील  त्यांनी गाडी पाण्यात घातली पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दोघेही मोटारसायकल सोबत वाहुन जाऊ लागले असता कपीलधर येथील नागरिकांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु  दोघांपैकी ओंकार याला वाचवण्यात यश आले परंतु यशराज हा वाहुन गेला होता. काल दुपारपासून या भागातील नागरिक पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल यशराज याचा शोध घेत होते. परंतु तो मिळून आला नव्हता  आणि आज सकाळी 9 वाजता बिंदुसरा नदीपात्रातील मीठु  शिंदे यांच्या शेताजवळ एका करंजीच्या झाडाला त्याचा मृतदेह आढळून आला आहे. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पीएसआय अनवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा