Subscribe Us

header ads

पिंपरी फाटा येथे स्कार्पिओ दुचाकीची समोरा समोर धडक एक गंभीर जखमी


प्रतिनिधी. नवनाथ गोरे

पिंपळनेर प्रतिनिधी/बीड बायपास  ते नागपूर हा रस्ता इतका खराब झाला आहे की गाडी खड्यांच्या बाहेर निघताच नाही  हा रस्ता बनवण्याची मागणी अनेक दिवसापासून उमरद खालसा. खांडे पारगाव . म्हाळस जवळा.नागपूर खुर्द. नागपूर बुद्रुक. या गावचे नागरिक करत आहेत या रस्त्याने खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात होत आहेत. आज तीनच्या सुमारास अंतरवन पिंपरी फाटा च्या जवळ काळ्या कलर ची स्कार्पिओ आणि स्प्लेंडर यांची खड्डा चुकवण्याच्या नादात सामोरा समोर धडक झाली असता स्कार्पिओ च्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले  आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असुन जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. धडक इतकी जोराची होती की अक्षरशा मोटारसायकल दहा ते पंधरा फूट फरफटत नेली आहे.घटनास्थळ पंचनामा करुण पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.मोटारसायकस्वार हे ईट येथील रहिवासी असल्याचे माहिती मिळत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा