Subscribe Us

header ads

लिंबागणेशचे माजी सैनिक सय्यद अकबर यांचा अपघाती मृत्यू


बीड प्रतिनिधी_भारतीय सैन्य दलातुन तीन वर्षापूर्वी निवृत्त झालेले  सैनिक बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भुमिपुत्र सय्यद अकबर सय्यद हबीब हे बुधवार १ सप्टेंबर २०२१ रोजी पाटोदा मांजरसुंबा या राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा- लिंबागणेश दरम्यान हरणाने दुचाकीला दिलेल्या धडकेत डोक्याला मार लागल्याने  गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान बुधवार ८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे लिंबागणेशवर शोककळा पसरली आहे.
लिंबागणेश येथील माजी सैनिक सय्यद अकबर सय्यद हबीब हे भारतीय सैन्य दलातुन  दोन  वर्षापूर्वी सेवा निवृत्त झाले होते.  १ सप्टेंबर २०२१ रोजी लिंबागणेशहुन बीडला दुचाकीवरून जात असतांना  अहमदपुर -नगर राष्ट्रीय महामार्गावर त्यांचा दुचाकीला अचानक रस्त्यावर आलेल्या हरणाने जोराची धडक दिली. या अपघातात अकबर यांच्या डोक्याला व छातीला मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. औरंगाबाद येथे मागील सात दिवसांपासुन त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सय्यद अकबर यांचे पार्थीव बुधवारी रात्री गावात आणल्यांनतर रात्री नऊ वाजता शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.  अकबर यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुली , आई ,वडील, एक भाऊ, बहिणी असा परिवार आहे . गावातील एक तरूण सैनिक निघुन गेल्याने शोककळा पसरली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा