Subscribe Us

header ads

वाळू माफिया ची लॉबिंग भारी!! प्रशासनासहित दलाल बांधले दारी!



बीड_ कुक्कड गाव खंडोबा मंदिर शेजारी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू विक्रीचा व्यवसाय चालू आहे. हा व्यवसाय  चालू राहावा हा उद्देश ठेवून महसूल प्रशासन यांनी देखील या वाळू माफियांना हिरवा कंदील  दाखवल्याची चर्चा कुक्कड गावात  खुलेआम चालू आहे. या अवैध धंद्याच्या संदर्भात सुरुवातीला काही लोकांनी आवाज उठवला होता.  मात्र मध्येच हा आवाज कुठे गायब झाला?  हे कळायला मार्ग नाही.  त्यानंतर एक नवीन आवाज आला की  ह्या वाळू माफिया कडे एक जादू आहे.  जो कोणी त्यांच्या विरोधात आवाज उठवेल त्याच्या आवाज बंद करण्याची ताकत  त्यांच्या भानामती मध्ये आहे.  अशी भानामती करून अनेक दलाल त्यांनी आपल्या दारात बांधल्याची ही चर्चा आहे.  एकंदरीत काय? तर  जेव्हा केव्हा अवैध धंदे चालू होतात.  तेव्हा तेव्हा पावसाळ्यातील डराव डराव  करणाऱ्या  बेंडका प्रमाणे किंवा पावसाळ्यात छत्र्या उगवतात आणि आपले अवैद्य धंदे चालवतात या वाळू माफियांच्या डोक्यावर महसूल प्रशासनाचा हात असल्याने हे वाळू माफिया बिनधास्तपणे विना रॉयल्टी लाखो ब्रास अवैध वाळूचा उपसा करीत प्रशासनाला चुना लावीत आहे. 
महसूल प्रशासन चे अधिकारी या वाळूमाफियांचे ताटाखालचे मांजर बनलेले आहे.  या वाळूमाफियांची एक संघटना आहे म्हणे!!  त्यांनी एकत्रपणे आपल्या धंद्यावर कुणाची नजर लागू नये असा उदात्त हेतू ठेवून या धंद्याच्या विरोधात ओरडणाऱ्या कावळ्यांचा आवाज बंद करण्यासाठी संघटनेची बैठक घेऊन प्रत्येकाकडून ठराविक खंडणी जमा करून ती रक्कम कावळ्यांच्या हवाली करून बिनधास्तपणे आपला अवैध धंदा चालवितात हे वाळूमाफिया अवैध वाळूचा उपसा करून वाळूचा साठा करतात आणि साठा केलेली वाळू मग पावसाळ्याच्या दिवसात मन मानेल त्या भावाने या वाळूचा धंदा करायला वाळू माफिया मोकळे!! हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून वाळूमाफियांनी कुक्कड गावाला  आपला अड्डा बनवला आहे. हा अड्डा बनवत असताना महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि अवैधरित्या वाळू गाड्या आणण्यासाठी डोळेझाक करावी या उद्देशाने तहसीलदार मंडळ अधिकारी यांना कधीच पेल्यात उतरवले गेले आहे.  अशी खुलेआम चर्चा कुक्कड गावचे लोक करीत आहे. चिरीमिरीच्या या सर्व प्रकारामुळे वाळूमाफियांचे कुक्कडगाव परिसरात सर्व काही आलबेल आहे. महसूल प्रशासनातील अधिकारी या वाळू माफियांना सांगतात की फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहू द्या?? हे कर्मचारी वाळू माफियांना कानमंत्र
देऊन तुमच्या विरोधात उठणारा आवाज आम्ही बंद करतो आणि  वरिष्ठपर्यंत हा आवाज जाऊ देत नाही
असे कानमंत्र महसूल प्रशासनाचे अधिकारी या वाळू माफियांना देतात जर हेच अधिकारी अशा पद्धतीचे
 संगनमताने जर अवैध धंद्यांना साथ दिली जात असेल तर कायदा सुव्यवस्थेला मुठ माती द्यायला वेळ लागणार नाही! येनकेन प्रकारे या वाळू माफियांची चलती चालू आहे.  त्याबद्दल कुणाची ओरडा असण्याची काहीच गरज नाही! मात्र अवैध होणारी वाहतूक,  अवैध होणारी साठेबाजी आणि त्यामुळे ग्राहकांची होणारी लूट! याला जबाबदार कोण?? हा मोठा प्रश्न जनसामान्य समोर पडलेला आहे.  हा प्रश्न कोण सोडवणार? कारण सर्वच यासंदर्भात मळून आहेत  की काय? असे वाटू लागले आहे.  कारण कित्येक तक्रारी आल्या कित्येकांनी निवेदने दिली.  मात्र कुणीही त्याची दखल घ्यायला तयार नाही!! जो कोणी आवाज उठवेल त्याचा आवाज दाबायला वाळू माफिया सज्ज आहे.  हा सर्व प्रकार पाहिल्यास महसूल प्रशासनाचे पुढे आणि राजकारणातील भ्रष्ट व्यक्तीच्या पुढे गोरगरिबांचे काही चालत नाही.  असे असले तरीही किमान लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष द्यावे अशी एक सामान्य अपेक्षा लोक बाळगून असतात. अर्थात त्या गरीब बापडयांची ही भोळीभाबडी अपेक्षा असते. त्याला कोण कितपत गंभीर्याने घेतो? हा वेगळा विषय आहे. मात्र सध्या कुक्कडगाव मध्ये वाळूमाफियांची चलती असल्याचे बोलले जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा