Subscribe Us

header ads

भाटसांगवी ते राक्षसभुवन नदीवरचा पूल पडल्याने नागरिकांचे होत आहे हाल


प्रतिनिधी नवनाथ गोरे
🔶🔷🔶🔷🔶🔷

वाकनाथपुर प्रतिनिधी_ भाटसांगवी ते राक्षसभुवन या गावाला जोडणारा टुक्कडमोडी नदीवरचा पुल १९ दिवस झाले अतिवृष्टी झाल्याने वाहुन गेला आहे १९ दिवसानंतर ही या पुलाचे काहीच काम केले नाही. हा पुल पडल्याने कुक्कडगाव. खुंड्रस. चव्हांनवाडी. राक्षसभुवन. वडगाव. या गावचा संपर्क टुटला आहे. एखाद्या मोठ्या नेत्याची सभा असेल तर हा पुल ऐका दिवसात तय्यार करतात परंतु १९ दिवसानंतर ही हा पुल जशास तसा आहे. अधिकारी येऊन बघून जातात पुल लवकर बांधण्याचे आश्वासन देतात पण काम मात्र होत नाही.
या गावातील नागरिकांना बीड ला येण्यासाठी १० की मी चे जास्त अंतर पार करून यावे लागते दवाखान्यात जाण्यासाठी  कोणताही रस्ता चांगला नाही खड्यातून कसाबसा रस्ता काडून दवाखान्यात जावे लागते. आणि हा पुल पडल्याने दवाखान्यात ही वेळेवर जाता येत नाही तरी प्रशासनाने लवकरात लवकर या पुलाचे काम करून घ्यावे अशी येथील गावकऱ्यांची मागणी आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा