Subscribe Us

header ads

नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ बंधावरच आर्थिक मदत करावी व पिक विमा द्यावा--- रेखाताई ठाकूर


नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार.. 

मोदी सरकारकडून ओबीसींची फसवणूक; रेखाताई ठाकूर 


 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी/ दि.०४  बीड पत्रकार परिषद सत्तेत आल्यानंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना करू असे जाहीरनाम्यात नमूद असताना केंद्रातील मोदी सरकारने ओबीसींना दिलेला शब्द पाळला नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली. बीड येथे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आयोजित घेली  कार्यकर्ता संवाद, समीक्षा, संघटन आढावा मेळाव्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
तुमच्या सोबत  फारूख अहमद  प्रदेश प्रवक्ते, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाठ, प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, विष्णू देवकाते अनिल डोंगरे जिल्हा प्रवक्ते भगवंत वायबसे,सचिन मेधडंबर, बबन वडमारे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड, यांची उपस्थिती होती.याप्रसंगी
पुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या की मागील सत्तर वर्षाच्या काळात ज्या ज्या पक्षांनी राज्यावर सत्ता गाजवली त्यातील एकही पक्षाने मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावले उचलली नाहीत. मराठवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा दुष्काळ, बेरोजगारी, उद्योग धंद्यांचा अभाव दिसून येते.या भागातील अनेक मंत्री,झाले परंतु यांच्याकडे धोरणच नाही केवळ जाती पातीचे राजकारण करण्यात आले यामुळे मराठवाडा विकासापासून कोसो दूर आहे. याला पर्यायी विकासाचे व्हिजन वंचित बहुजन आघाडीकडे असल्याचे याप्रसंगी रेखा ठाकूर म्हणाल्या.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आले आहेत, रुग्ण संख्या घटल्याने त्या प्रक्रियेस गती मिळावी, याबरोबरच गत निवडणूकित जातीनिहाय जनगणना करण्याचा जो शब्द केंद्र सरकारने दिला तो पाळला नाही  यावेळी सांगितले.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात काही दिवसात पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे सत्ताधारी पक्षातील मंत्री बांधावर जाऊन फोटोसेशन करत आहे ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी व गत वर्षी चा विमा देखील शेतकरी तात्काळ द्यावा अशीही टिका पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली मधुन करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा