Subscribe Us

header ads

अतिक्रमण विरोधात युवकाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

बीड-:माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे हनुमान मंदिराच्या जागेवरील ग्रामपंचायत सदस्यांने केलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी करून देखील प्रशासनाने दुर्लक्ष केले. दरम्यान संतप्त युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी घडली
तालखेड येथील राजपुतपुरा हनुमान मंदिराच्या जागेवर ग्रा.पं.सदस्य रमेश प्रदिप पाटील याने अतिक्रमण केले. त्याठिकाणी स्वत:ची किराणा दुकान थाटले. हे अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी विलास कैलास मांदड या तरूणाने केली. माजलगाव तहसील, ग्रामपंचायत तालखेड आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदन देवूनही अतिक्रमण हटवण्यात आलेच नाही. शेवटी अतिक्रमण हटवले जात नसल्याने विलास मांदड याने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तो पुर्णत: रॉकेलने भिजलेला होता. सदरील हा प्रकार तेथील चौकीतील पोलीस कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली व या तरूणाला ताब्यात घेवून शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन केले. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा